Happy Parenting
Happy Parenting Sakal
महाराष्ट्र

पालकांनो, गुणांच्या टक्केवारीसोबतच शारीरिक शिक्षणालाही द्या प्राधान्य! व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासात शारीरिक शिक्षण खूप मोलाचे

तात्या लांडगे

सोलापूर : शरीराबरेबरच मन, भावना, विचारांचे संस्काराचे धडे शारीरिक शिक्षणातून मिळतात. स्नायू-हालचालींमधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवाद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्यापर्यंतची वाढ व विकास त्यातूनच साधला जातो. शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्म्याचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. मात्र, काही वर्षांपासून शाळा व पालकांकडून गुणांच्या टक्केवारीलाच प्राधान्य दिले जात असल्याने मुलांमध्ये आरोग्याच्या समस्या दिसू लागल्या आहेत. याबाबत पालक आणि मुलांनी सजग होऊन कृतिशील प्रयत्न करणे गरजेचे आहे.

प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणाअंतर्गत अनौपचारिक अनुकरणात्मक हालचाली, कृतियुक्त गाणी, गोष्टी नाट्यकरण, मनोरंजनात्मक खेळ, कसरतीच्या व्यायामावर भर दिला आहे. या विद्यार्थ्यांच्या शरीरावर व अवयवांवर योग्य तो ताबा मिळवून कौशल्य संपादन करण्यासाठी धावणे, फेकणे, उड्या मारणे याचा समावेश आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात विकासात्मक व्यायामप्रकार, मैदानी उपक्रम, तालबद्ध हालचाली, योगासने, कवायत, द्वंद्वात्मक व्यायाम प्रकारांचा समावेश आहे.

तर इयत्ता नववी व दहावीतील मुलामुलींची उंची झपाट्याने वाढत असते. तसेच समाजमान्यता प्राप्त करणे, नायकत्व करणे, सहकार्याच्या अवधानाचे केंद्र बनणे, अशा प्रवृत्ती त्यांच्यात दिसू लागतात. काहीतरी धाडसी कृत्य करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे शारीरिक शिक्षण हा विषय पुस्तकात दडवून न ठेवता मुलांना कृतीतून त्याची आवड निर्माण करून देणे काळाची गरज आहे. पालकांनीही मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण करणे गरजेचे आहे.

शारीरिक शिक्षणाची चतु:सूत्री...

  • कार्यक्षमतेचा विकास

  • इंद्रिय विकास व शरीराच्या सुदृढतेवर शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते. इंद्रियांचा विकास कृतिपूर्ण परिश्रमातून होतो. त्यासाठी लहानपणापासून होणाऱ्या हालचाली कारणीभूत ठरतात. इंद्रियांना पोषक ठरणाऱ्या व त्यांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या हालचाली शिकवणे हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

  • --------------------------------------------------------------------------------------------

  • मज्जासंस्था व स्नायुसंस्थांमधील सहकार्यात्मक विकास

  • लहान मुलांच्या सर्व नैसर्गिक हालचाली प्रयत्नाने आणि सरावाने हळूहळू सफाईदार होतात. चालणे, धावणे, उड्या मारणे, फेकणे, झेलणे, शरीराचा तोल सांभाळणे या मूलभूत क्रिया सहजपणे व कौशल्यपूर्ण होणे आवश्यक असते. बालवयातच मुलांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांच्या स्नायू व मज्जासंस्थांमधील सहसंबंध सुधारतात.

  • --------------------------------------------------------------------------------------------

  • व्यक्तिमत्त्वाचा विकास

  • शारीरिक शिक्षणातून व्यक्तीचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास होतो. व्यक्तिगत स्वच्छता, व्यायाम, आहार, आरोग्यविषयक सवयी, विश्रांती, मनोरंजनाचा त्यात समावेश आहे. योगाभ्यासाद्वारे मानसिक स्वास्थ्याची प्राप्ती होते. शारीरिक शिक्षणाद्वारे शारीरिक, मानसिक, सामाजिक सुस्थिती साधली जाते.

  • --------------------------------------------------------------------------------------------------

  • मनोरंजन

  • मनोरंजनातून व्यक्तीला आनंद, समाधान व स्वास्थ मिळते. मनोरंजन हा शारीरिक शिक्षणाचा अविभाज्य भाग होय. व्यावसायिक कार्यक्षमतेचा विकास, सहजप्रवृत्तींचा विकास व उदात्तीकरण, व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाचा विकासही त्यातून होतो.

शारीरिक शिक्षणावर भर देण्याचा प्रयत्न

विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे आरोग्य शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ राहील, यादृष्टीने तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा राबविणे अपेक्षित आहे. त्यात सर्वच शाळांना सहभाग असावा, असे नियोजन असते. नुकत्याच शाळांमध्ये स्पर्धा पार पडल्या आहेत.

- प्रसाद मिरकले, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: विधानसभेपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार? बंडखोर ठाकरे-पवारांकडे परतणार?

Election Commission : ''सिस्टीममध्ये कुठलीही चूक होऊ शकत नाही'', मतमोजणीच्या तयारीबद्दल मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले...

Priyanka Chopra Beauty Tips: चमकदार त्वचेसाठी देसी गर्लने शेअर केली बॉडी स्क्रब बनवण्याची सोपी पद्धत

Bengluru Viral Video : बंगळुरूमध्ये कोकोनट अटॅकरची दहशत ; भरदिवसा गाडी फोडली, व्हायरल होतोय व्हिडीओ

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचा कळंबा कारागृहात खून; नेमकं काय घडलं? मृतदेह स्वीकारण्यास पत्नीचा का नकार?

SCROLL FOR NEXT