child health sakal
महाराष्ट्र बातम्या

Child Health: पालकांनो, मुलांना ‘या’ ७ गोष्टींपासून दूर ठेवा अन् वाढवा मेंदूची कुशाग्रता; संतुलित आहार व मेडिटेशनचा होईल लाभ

Parenting Tips: जन्मत:च कोण हुशार नसतो. बालपणातील संस्कार, त्याची जडणघडण, सभोवतालचे वातावरण, आई-वडिलांचा सुसंवाद, मित्रांची संगत, या बाबी चिमुकल्यावर खूप फरक पाडतात. ७ प्रमुख गोष्टी कारणीभूत आहेत. त्या टाळल्या तर निश्चित मेंदूची कुशाग्रता वाढेल, असा विश्वास अनेकांना आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जन्मत:च कोण हुशार नसतो, असे म्हटले जाते. बालपणातील संस्कार, त्याची जडणघडण, सभोवतालचे वातावरण, आई-वडिलांचा सुसंवाद, मित्रांची संगत, या सर्व बाबी त्या चिमुकल्यावर खूप फरक पाडतात.

अनेकजण शाळेत ’ढ’ समजले जातात. पण, त्याला सात प्रमुख गोष्टी कारणीभूत आहेत. त्या टाळल्या तर निश्चितपणे मेंदूची कुशाग्रता वाढेल, असा विश्वास अनेकांना आहे.

‘या’ गोष्टींचा विचार करा अन्‌ नक्की टाळा

  • १) खूप वेळ अंधारात राहणे, घरात प्रकाश कमी असणे किंवा प्रकशात अजिबात न जाणे.

  • २) सतत जागरण करणे, रात्री जागण्याने हार्मोन्सचे संतुलन बिघडते व मेंदूच्या कामातही अडथळे येतात.

  • ३) सतत निगेटिव्ह गोष्टी पाहणे किंवा ऐकणे, बोलणे, इतरांविषयी सतत निगेटिव्ह बोलणे किंवा विचार करणे.

  • ४) जगापासून स्वत:ला अलिप्त करणे, एकटे राहणे, माणसांशी संपर्क नाही, नव्या ओळखी न होणे.

  • ५) कानात सतत हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणी ऐकणे.

  • ६) सतत पडून राहणे, शरीराची काही हालचाल नाही, व्यायाम करणे नाही.

  • ७) स्क्रिनचा अतिवापर, रात्री उशिरा झोपणे आणि खूप उशिरा उठणे.

मेंदूच्या आजाराची लक्षणे अन्‌...

डोकेदुखी, अर्धशिशी, फिट्स, आकडी, लकवा, पक्षाघात, हातापायांना मुंग्या येणे, मानेचे आणि कंबरेचे दुखणे, स्मृतीभ्रंश, कंपवात, मेंदूची गाठ, डोक्याला लागलेला मार, मेंदू संक्रमणचाही मेंदूच्या विकारांमध्ये समावेश होतो. तोल जाणे, डोकेदुखी अशी सर्वसाधारण वाटणारी लक्षणेही मेंदूच्या गंभीर आजाराकडे आपले लक्ष वेधत असतात.

त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करणेच फायद्याचे ठरते. मायग्रेन (डोकेदुखी) म्हणजे मेंदूच्या विकारातील अनेकदा दिसणारे लक्षण म्हणजे डोकेदुखी. तीव्र स्वरूपाची डोकेदुखी, चक्कर, मासिक पाळीत जास्तवेळा हा आजार आढळतो. वेळेवर जेवण, झोप, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार हे या आजाराला नियंत्रित करू शकतात.

संतुलित आहार अन्‌ ध्यानधारणेचा होईल मोठा लाभ

मेंदूची कुशाग्रता वाढविण्यासाठी संतुलित आहार (फळे-भाजीपाला, डाळी, गायीचे तूप, दुधाचे पदार्थ असे) महत्त्वाचा आहे. एकाग्रता वाढविण्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा विशेषतः: सकाळच्या वेळी ध्यानधारणा (मेडिटेशन) करणे आणि वेगवेगळ्या सकारात्मक विषयांचे वाचन हवे. त्यातून स्क्रीन पाहणे कमी होईल.

मोठ्या यशस्वी लोकांच्या प्रगतीच्या कथा वाचाव्यात. शक्यतो रात्री दहा वाजेपर्यंत झोपावेच आणि सकाळी सूर्योदयापूर्वी उठण्याचाही आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, असा विश्वास शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विना जावळे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT