beed esakal
महाराष्ट्र बातम्या

मुंडे भाऊ-बहिणीत पुन्हा काटे की टक्कर! 'या' संस्थेसाठी दोघांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सविस्तर

८११ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

रुपेश नामदास

परळी वैजनाथ: शहरातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेची निवडणूक प्रक्रिया तब्बल १२ वर्षानंतर पूर्ण झाली. शनिवारी (ता.६) शांततेत मतदान पार पडले. १,२२१ पैकी ८११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर आमदार धनंजय मुंडे यांनीही मतदान केले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत मतमोजणीवर बंदी घालण्यात आलेली आहे.

जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बारा वर्षांपूर्वी झाली होती. प्रदीप खाडे यांचा ४१ (अ) चा अर्ज वैध ठरवून जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणूक घेण्याचे आदेश देत निवडणूक अधिकारी म्हणून द.ल.सावंत यांची नियुक्ती केल्यानंतर सावंत यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

यात हयात सभासदांतून ३१,आश्रयदाता सभासदांतून १, हितचिंतक १ व सहाय्यक सभासदातून १ असे ३४ संचालक निवडले जाणार होते. यामध्ये आश्रयदाता गटातून आमदार धनंजय मुंडे व हितचिंतक गटातून पंकजा मुंडे बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित ३२ जागेसाठी शनिवारी मतदान झाले.

मतमोजणी रविवारी (ता.७) होणार होती मात्र न्यायालयाने मतमोजणी प्रक्रियेवर बंदी घातलेली आहे. शनिवारी झालेल्या मतदानात १,२२१ मतदारांपैकी ८११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

यामध्ये हयात सभासदांतून १,२११ पैकी ८०१ तर सहाय्यक सभासद १० पैकी १० जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर आमदार धनंजय मुंडे यांनी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मतदान केले.

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मतदान केंद्रावर भेट देत आपल्या समर्थकांचा उत्साह वाढवला. शहरातील सर्वात मोठ्या शैक्षणिक संस्थेवर कोणाचे वर्चस्व प्रस्थापित होणार याकडे परळीकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT