Patent to Konkan Agricultural University Deep and Make kokum syrup dabhol sakal
महाराष्ट्र बातम्या

‘डीप’ करा; कोकम सरबत बनवा

कोकण कृषी विद्यापीठाला पेटंट; बनविण्यास अत्यंत सोपे

चंद्रशेखर जोशी

दाभोळ : कोकण कृषी विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी कोकम सरबत डीप बॅग बनवली आहे. व्यापारीदृष्ट्या लवकरच या बॅग उत्तम ‘सॅशे’मधून बाजारात येणार आहेत. याबाबतचे पेटंट कृषी विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. कोकम सरबत डीप बॅग बनविण्याचे हे तंत्र ज्यांना हवे असेल त्यांना ते देण्यास विद्यापीठ तयार आहे. याचे पेटंट कोकण कृषी विद्यापीठाचे पहिलेच पेटंट आहे. ‘डीप टी’प्रमाणे कोकम सरबताची ही बॅग पाण्यात बुडवायची आणि त्यात साखर टाकली की उत्तम दर्जाचे कोकम सरबत तयार होते.

गुणवत्तेच्या सर्व निकषांना हे खरे उतरले आहे. कोकण कृषी विद्यापीठात नुकताच सुवर्णपालवी महोत्सव झाला. त्यावेळी या कोकम सरबत डीप बॅगचे प्रात्यक्षिक पाहायला मिळाले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या काढणी पश्चात व्यवस्थापन पदव्युत्तर संस्था रोहा (जि. रायगड) येथील प्रा. व प्रमुख डॉ. प्रदीप रेळेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोकम सरबत डीप बॅग तयार करण्याचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले. या संशोधन कार्यात डॉ. प्रदीप रेळेकर यांना ललित खापरे व प्रशांत देबाजे, डॉ. केशव पुजारी यांनी सहकार्य केले. २०१७ पासून पाच वर्षे पेटंट मिळविण्यात गेली. त्यासाठीच्या सर्व निकषांस या बॅग पात्र ठरल्या आहेत.

या तंत्रात कोकम सालीचा रस काढून घेतल्यावर शिल्लक राहिलेल्या भागाची पावडर बनविण्यात येते. ती एकात एक अशा दोन फिल्टर बॅगमध्ये भरली जाते. या पावडरमध्ये योग्य मीठ व जिऱ्याचा स्वादही मिसळला जातो. उत्तम सॅशेमध्ये ते देण्यात येणार आहे. एक कोकम सरबत डीप बॅग दीड मिनिटांपर्यंत १३५ मिली लिटर पाण्यात बुडवायची आणि पिळून घ्यायची. त्यानंतर सरबताला रंग व स्वाद येतो. त्यात जरुरीपुरती साखर घालायची. त्यासाठी आवश्यक ती साखर सॅशेमधूनही दिली जाणार आहे. लवकरच कोकण कृषी विद्यापीठ व्यावसायिक दृष्ट्या याचे उत्पादन करणार आहे.

अशी आहे पारंपरिक पद्धत

पिकलेल्या कोकम फळाच्या सालीचा उपयोग प्रामुख्याने कोकम सिरप करण्यासाठी केला जातो. कोकम सिरप तयार करण्यासाठी कोकम सालीत एकास दोन या प्रमाणात साखर मिसळून ठेवल्यावर १० ते १२ दिवसांत सालीतील रसात साखर विरघळून कोकम सिरप तयार होते. आणि त्यानंतर सिरपमध्ये एकास पाच प्रमाणात पाणी मिसळून पारंपरिक पद्धतीने कोकम सरबत तयार केले जाते.

ही आहेत वैशिष्ट्ये

  • कोकमच्या सालीचाही किफायतशीर उपयोग

  • चोथा न टाकता गुणवत्तापूर्ण सरबतासाठी उपयोग

  • प्रवासात सहज वापरता येणारे, तयार करण्यास सोपे

  • विमान, रेल्वेसेवा यासह मोठ्या आस्थापनांत वापर शक्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : वारजेत एका व्यक्तीकडून जिवंत काडतुसे आणि पिस्तुल जप्त

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT