Pavitra Portal  sakal
महाराष्ट्र बातम्या

Pavitra Portal : विनामुलाखत निवड,मात्र, नियुक्ती मिळेना;पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्या ६४५ शिक्षकांची व्यथा

पवित्र पोर्टलमधून रयत शिक्षण संस्थेच्या शाळांत विनामुलाखत निवड झालेले ६४५ जण नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

सुषेन जाधव

छत्रपती संभाजीनगर : पवित्र पोर्टलमधून रयत शिक्षण संस्थेच्या शाळांत विनामुलाखत निवड झालेले ६४५ जण नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यात मराठवाड्यातील ९० जणांचा समावेश आहे. वर्ष २०२२ मध्ये राज्यात ११ हजार ८५ शिक्षणसेवक पदासाठी पवित्र पोर्टलद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली. यातून २५ फेब्रुवारी २०२४ ला निवड झालेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या. त्यामध्ये ६४५ जण रयत शिक्षण संस्थांच्या शाळांसाठी निवडले गेले. परंतु, रयतमधील कंत्राटी पद्धतीवर सेवा करणाऱ्या शिक्षकांनी कायम करण्यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे पवित्र पोर्टलमधून निवड झालेल्यांना नियुक्तीची प्रतीक्षा आहे.

निवड झालेल्या ६४५ जणांपैकी ९० जण मराठवाड्यातील आहेत. ६४५ जणांना नियुक्ती मिळण्यासाठी आधीच पाच महिने विलंब झाला. त्यामुळे या शिक्षकांच्या सेवापुस्तिकेवर या कालावधीची नोंद होणार नाही.

निवड झालेल्या शिक्षकांना रुजू करून घेण्यासंदर्भात रयत शिक्षण संस्थेला कळविले आहे. ‘रयत’ही याबाबतीत सकारात्मक आहे. या प्रकरणावर ५ जुलैला न्यायालयात सुनावणी झाली आहे.

- सूरज मांढरे, शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य.

होतेय घुसमट

निवड झालेल्या जालना जिल्ह्यातील एका शिक्षिकेने सांगितले, ‘‘दीडशे किलोमीटरहून येऊन छत्रपती संभाजीनगरात पार्ट टाइम काम करीत परीक्षा दिली. १५० गुण मिळविले. निवड झाल्याने कौतुक झाले. पण, आता कधी रुजू होणार म्हणून नातेवाईक प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे घुसमट होत आहे.’’

नामांकित संस्था आहे म्हणून ‘रयत’ला प्राधान्यक्रम दिला होता. परंतु, संस्थेकडून, शिक्षण आयुक्तांकडून हे प्रकरण न्यायालयात आहे, असे उत्तर दिले जाते. तीन वर्षे कमी पगारात काम करावे लागणार आहे. भविष्यातील तोटा टळण्यासाठी किमान रुजू तरी करून घ्या.

- रयत शिक्षण संस्थेत निवड झालेला उमेदवार

कधी संस्थेत, तर कधी शिक्षण आयुक्तालयात जातो. नवी पिढी घडविण्याचे काम कसे करायचे? ‘रयत’ने रुजू करून घ्यावे; अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांत समायोजन करावे.

- निवड झालेला उमेदवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: सिंहगड ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT