Mantralay maharashtra sakal media
महाराष्ट्र बातम्या

वेतन अधीक्षकांचे आदेश! ‘ही’ कागदपत्रे नसलेल्या शिक्षकांचा थांबणार पगार; ऑगस्टच्या पगारबिलासोबत मुख्याध्यापकांना जोडावी लागणार सर्वांची कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत

सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १८ नोव्हेंबर २०१२ ते ७ जुलै २०२५ या काळातील सर्व शैक्षणिक पात्रता व नोकरीला लागल्यानंतरच्या कागदपत्रांची शासनाने नेमलेली विशेष समिती पडताळणी करणार आहे. आता ऑगस्टचे वेतनबिल सादर करताना मुख्यध्यापकांनी ती कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत जोडणे बंधनकारक आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १८ नोव्हेंबर २०१२ ते ७ जुलै २०२५ या काळातील सर्व शैक्षणिक पात्रता व नोकरीला लागल्यानंतरच्या कागदपत्रांची शासनाने नेमलेली विशेष समिती पडताळणी करणार आहे. आता ऑगस्टचे वेतनबिल सादर करताना मुख्यध्यापकांनी ती कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत जोडणे बंधनकारक आहे. मुदतीत ज्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड होणार नाहीत, त्यांचा पगार थांबणार आहे.

शालार्थ आयडी व मान्यता बोगस घेऊन शासनाचे वेतन घेणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन मागविली आहेत. त्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या अनुषंगाने वेतन अधीक्षकांनी बुधवारी (ता. १३) सर्व मुख्याध्यापकांना तसे आदेश काढले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता व शालार्थ आयडी बनावट जोडून शासनाचा पगार घेतल्याची बाब पडतताळणीतून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शालार्थ आयडी, रूजू अहवाल, मान्यता आदेश, व्यवस्थापनाचे तथा संस्थेचे नियुक्ती आदेश अशी कागदपत्रे मागविली आहेत. या सर्व कागदपत्रांची पडताळणी शासनाने नेमलेली पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली तिघांची विशेष समिती करणार आहे.

अपलोड कागदपत्रांची सत्यता तपासली जाणार

सर्व मुख्याध्यापकांनी त्यांच्या शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालार्थ प्रणालीवरून अपलोड करायची आहेत. मुदतीत सर्वांनी कागदपत्रे अपलोड करावीत, अशा सक्त सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. दुसरीकडे त्या शिक्षकास वैयक्तिक मान्यता देताना त्यांची संपूर्ण कागदपत्रे शिक्षणाधिकाऱ्यांकडे देखील आहेत. मान्यतेच्या नोंदी शिक्षणाधिकारी कार्यालयातील आवक-जावक रजिस्टरमध्येही आहेत. त्यामुळे मुख्याध्यापकांनी अपलोड केलेली कागदपत्रे व शिक्षणाधिकाऱ्यांकडील कागदपत्रे, यातील साम्यता पडताळली जाणार आहे.

मुख्याध्यापकांनी मुदतीत करावी कार्यवाही

शासनाच्या आदेशानुसार सर्व शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता, नियुक्ती आदेश, शालार्थ आयडी, अशी कागदपत्रे सर्व मुख्याध्यापकांना ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहेत. वेतन अधीक्षकांनी तसे आदेश सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना काढले आहेत. त्यानुसार मुख्याध्यापकांनी मुदतीत ही कार्यवाही करायची असून त्याअनुषंगाने बुधवारी (ता. १३) शिक्षण संचालक, उपसंचालकांनी निर्देश दिले आहेत.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : स्वातंत्र्य दिनीच मंत्रालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलनकर्त्या महिलांना घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Updates : पालिका निर्णयाविरोधात हिंदू खाटीक समाजाचा कोंबडीसह आंदोलन

'तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का?' रजनीकांत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, थलैवाच्या वक्तव्यामुळे “बॉडी शेमिंग”चा मुद्दा पुन्हा चर्चेत

Independance Day Photos : 15 ऑगस्ट 1947 ला कसा साजरा झालेला भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन? 10 फोटो पाहून म्हणाल, हिंदुस्थान ज़िंदाबाद!

Maharashtra Government : जमीन मोजणीला मिळणार गती; भूमी अभिलेख विभागाला १२०० रोव्हर खरेदीस मान्यता

SCROLL FOR NEXT