PCMC
PCMC Sakal
महाराष्ट्र

PCMC | तीन सदस्यीय पद्धतीने होणार पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक

ओमकार वाबळे

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. २००२ साली याच पद्धतीने निवडणूक पार पडली होती. यानंतर वार्ड पद्धती आली. तसेच मागील निवडणूक प्रभाग पद्धतीने पार पडली. यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड मनपामध्ये भाजपचे कमळ फुलले होते. राष्ट्रवादीचा एकहाती असणाऱ्या बालेकिल्ल्याला भाजपने भगदाड पाडले.

२००२ साली तीन सदस्यीय पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली. तर काँग्रेसकडे विरोधी पक्षाची जबाबदारी होती. यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये कायम अजित पवार यांचे निकटवर्तीय महापौर पदाच्या खुर्चीवर बसत होते. २०१४ मध्ये देशात मोदी सरकार आल्यानंतर मोदी लाटेचे पडसाद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाहायला मिळाले. यानंतर पुण्यातील सूत्र राष्ट्रवादीकडून भाजपकडे गेली. २०१९च्या विधानसभा निवडणुकीतही पुण्यातील ८ जागांवर भाजपाचे आमदार निवडून आले. याआधी पिंपरी-चिंचवड आणि पुणे मनपामध्ये सत्तापालट होऊन भाजपचे महापौर खुर्चीवर बसले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT