Sharad Pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

राज ठाकरेंच्या सभांमध्ये करमणूक होते म्हणून लोक जातात; शरद पवारांचा खोचक टोला

राज ठाकरेंच्या भाषणातील स्टाईलवरुन शरद पवारांनी त्यांना टोला लगावला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज ठाकरे सभांमध्ये आपल्या खास स्टाईलनं भाषण करत असतात. यामध्ये लोकांची करमणूक होते त्यामुळं लोक त्यांच्या सभांना गर्दी करतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरेंच्या उत्तर सभेतील आरोपांना उत्तर देण्यासाठी पवारांनी पत्रकार परिषद घेतली. (People go to Raj Thackeray rally for entertainment Sharad Pawar sharp blow)

शरद पवार म्हणाले, "राज ठाकरेंनी जाता जाता सांगितलं की त्यांचा पक्ष हा संपवणारा पक्ष आहे. ठीक आहे, ते म्हणतात ते खरं आहे. त्यांच्या संपवणाऱ्या पक्षाची महाराष्ट्रातील मतदानांनी योग्य दखल घेतली आहे. त्यामुळं त्यांना विधीमंडळात एकही जागा दिलेली नाही. यातून मतदारांनी यांची ओळख योग्य प्रकारे केली"

"राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात हे मी यापूर्वीही सांगितलं आहे. त्यांच्या सभेत शिवराळ भाषा, नकला किंवा काहीबाही उल्लेख असतो, या सर्व गोष्टींसंबंधी लोकांची करमणूक होते, त्यांमुळं लोक त्यांच्या सभेला गर्दी करतात," अशा शब्दांत पवारांनी राज ठाकरेंना खोचक टोलाही लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: ''..तोपर्यंत मी शर्टचं वरचं बटण लावणार नाही'', विधानसभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

भाजपच नाही, सोनिया गांधींनीही शब्द दिला होता! २०२७ पूर्वी विदर्भ वेगळा होणार, विदर्भ राज्य आंदोलन समितीने व्यक्त केला विश्वास

आम्ही आमचं बाळ गमावलं... लोकप्रिय मराठी इन्फ्लूएन्सर कपलला धक्का; म्हणाले- ५ व्या महिन्यात समजलं की...

Meat And Fish Ban: मांस आणि माशांच्या खुल्या विक्रीवर बंदी! आता परवानगी असेल तरच दुकान चालणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

Mumbai: मुंबईतील हवा ‘भीषण’ स्तरावर; बांधकामांना आठवडाभर स्थगितीची मागणी; पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात काय लिहिलंय?

SCROLL FOR NEXT