Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

लसीकरणाला ग्रामीण भागातील लोक गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत - अजित पवार

विधानसभेत बोलताना अजित पवार यांनी याबाबत काळजी व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवारांनी आज राज्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीवरही भाष्य केलं. तसेच ग्रामीण भागात कोरोनाच्या स्थितीला गांभीर्यानं घेतलं जात नाहीए, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी चीनमधील शहरांमध्ये सध्या लॉकडाउन लावण्यात येत असल्याची माहिती दिली. (People in rural areas do not seem to take vaccination seriously says Ajit Pawar)

पवार म्हणाले, एक गोष्ट मी आजच्या उत्तराच्या निमित्त महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की, ज्या चीनमधून कोरोना वाढीला लागला त्या चीनमध्ये आज पंधरा पेक्षा जास्त महत्वाची शहरं लॉकडाऊन झाली आहेत. म्हणजेच कोरोनाचा विषय सध्या आपणही सहजतेनं घेऊ नका, याच्याकडे गांभीर्यानं पाहा. दीड कोटी लोकसंख्या असलेलं चीनमधील एक शहर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. हा आजार बाहेर वाढू नये, चौथी लाट येऊ नये यासाठी ही काळजी घेतली आहे. आपणही कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.

अजूनही काही जण लसीकरणाच्या बाबतीत म्हणावा असा प्रतिसाद देत नाहीत. कारण ग्रामीण भागात फिरत असताना लोक लसीकरणाला गंभीरतेनं घेत नसल्याची वस्तूस्थिती आहे. पण आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना लसीकरणाचं महत्व समजावून सांगण्याची नितांत गरजेच आहे, असंही अजित पवार यांनी सभागृहातील सर्वच सदस्यांना आवाहन केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT