Uddhav Thackeray-Ajit Pawar-Devendra Fadnavis google
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey : निवडणुका झाल्यास जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण?

भाग्यश्री राऊत

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) सत्तेत दोन वर्ष पूर्ण केली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) नेतृत्वात हे सरकार काम करत आहे. पण, गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने दावा केला जातोय, की राज्यात मध्यावती निवडणुका लागतील. याबाबत 'सकाळ-साम' (Sakal Saam Survey) मिळून एक सर्वेक्षण केलंय.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी अजूनही मलाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय, असं वक्तव्य केलं होतं. मग खरंच निवडणुका लागल्या तर जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण असेल? असा प्रश्न उपस्थित होतो. सकाळ-सामने केलेल्या सर्वेक्षणातून निकाल समोर आले आहेत.

राज्यभरात सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून सॅम्पल सर्व्हे करण्यात आला. याशिवाय २८८ मतदारसंघात गट चर्चाही घेण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व्हेसाठी २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलेल्या मतदारांची निवड करण्यात आली. हे सॅम्पल निवडताना शहर, ग्रामीण आणि निमशहरी असा समतोल राखला असून महापालिका हद्दीतूनही सॅम्पल निवडण्यात आले. तसेच शिक्षण, आर्थिक, सामाजिक, लिंग, वय हे सर्व निकष लक्षात घेऊन हा सर्व्हे करण्यात आला.

कोण आहे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री? -

सर्वेक्षण करताना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारला असता, जनतेचे कौल पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदी बसलेल्या उद्धव ठाकरेंना आहेत असं दिसतंय. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदी बसलेले ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती आहेत. ते थेट मुख्यमंत्री झाले आणि जनतेच्या मनात त्यांनी विशेषतः कोरोना काळात चांगले स्थान मिळविल्याचे दिसतेय. २९.७ टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली आहे. दुसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीसांना पसंती दिली. त्यांना २२.४ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. भाजपला मिळालेला एकूण कौल सकारात्मक असणे आणि विरोधी पक्षनेते म्हणून कामगिरीबद्दल असमाधानी असतानाही फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल सर्वसाधारण सकारात्मकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT