पंढरपूर - उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेले पाणी sakal
महाराष्ट्र बातम्या

भीमा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा! उजनी धरणातून भीमा नदीत सोडला 71 हजार क्युसेकचा विसर्ग, वीर धरणातूनही सोडला 71 हजार क्युसेकचा विसर्ग

उजनी धरण ओव्हरप्लो झाले असून सध्या दौंडवरून उजनीत 70 हजार क्युसेकने आवक आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत 71 हजार 600 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदी काठावरील नागरिकांना उजनी धरण व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : उजनी धरण ओव्हरप्लो झाले असून सध्या दौंडवरून उजनीत 70 हजार क्युसेकने आवक आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीत 71 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदी काठावरील नागरिकांना उजनी धरण व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून दौंडवरून उजनी धरणात मोठा विसर्ग जमा होत आहे. त्याअनुषंगाने धरणातील उपयुक्त साठा क्षमतेपेक्षा जास्त होणार असल्याने नदीतून पाणी सोडले जात आहे. रविवारी (ता. २५) रात्री आठ वाजता धरणातून सोडलेला विसर्ग 50 हजारांवरून 70 हजार करण्यात आला आहे. याशिवाय धरणावरील विद्युतगृहासाठी 1600 क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना उजनी धरण व्यवस्थापन विभागाने दिल्या आहेत.

वीर अन्‌ उजनीचा मिळून 1.42 लाख क्युसेकचा विसर्ग

दरम्यान, वीर धरणातूनही 71 हजार क्युसेकचा विसर्ग नदीत सोडला आहे. पुढील 20 तासांत (सोमवारी संध्याकाळी सहानंतर) तो विसर्ग आणि उजनी धरणातून सोडलेला 71 हजार क्युसेकचा तो विसर्ग उद्या पंढरपूरजवळ भीमा नदी पात्रात जमा होईल. त्यामुळे भीमा नदी काठोकाठ भरून वहाणार असल्याने नदी काठावरील नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला संधीची वाट का पाहावी लागतेय? श्रेयस अय्यरने खरं कारण सांगितलं; म्हणाला, 'वेळ आली की तो राज्य करेल'

राहू येथे सलग दुसऱ्या दिवशी दुसरा बिबट्या जेरबंद; साडेचार वर्षांची मादी पिंजऱ्यात अडकल्याने नागरिकांमधे दहशत

Condom Company Stock: कंडोम बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरचा धमाका; सहा महिन्यांत २५७% वाढ, गुंतवणूकदार मालामाल

भातपीकाचे आगार धोक्यात; राजगड तालुक्यातील बहुतांशी भात खाचरे कोरडी, शेतकरी चिंतेत

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये एसटी बसचा भीषण अपघात; बाप-लेकीसह तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT