solapur city

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

लोकांच्या कानात बोळे, पोलिस मात्र बधिर! सोलापुरात अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिस आयुक्तांचा आदेश पायदळी; बंदी असूनही ‘डीजे’चा दणदणाट

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिस आयुक्तांच्या आदेशालाच ‘डीजे’च्या दणदणाटाने ठेंगा दाखविण्यात आला. प्रखर बीम, प्लाझमा, लेझर बीम लाईट आणि ‘डीजे’ साऊंड सिस्टिमवर बंदीचे लेखी आदेश असतानाही मिरवणुकीत मोठ्या आवाजाचा दणदणाट आणि लेझर लाईटचा सर्रास वापर झाला. विशेष म्हणजे, याच मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात असतानाही नियमभंग सुरूच राहिला.

तात्या लांडगे

सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत पोलिस आयुक्तांच्या आदेशालाच ‘डीजे’च्या दणदणाटाने ठेंगा दाखविण्यात आला. प्रखर बीम, प्लाझमा, लेझर बीम लाईट आणि ‘डीजे’ साऊंड सिस्टिमवर बंदीचे लेखी आदेश असतानाही मिरवणुकीत मोठ्या आवाजाचा दणदणाट आणि लेझर लाईटचा सर्रास वापर झाला. विशेष म्हणजे, याच मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी मोठा पोलिस फौजफाटा तैनात असतानाही नियमभंग सुरूच राहिला.

मोठ्या आवाजाचे साऊंड आणि डान्स एवढ्यापुरता अण्णा भाऊ साठे यांचा वारसा मर्यादित नसून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवावेत, कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी २८ जुलैच्या शांतता समितीच्या बैठकीत मंडळांना केले होते. त्यानंतर ३० जुलैला प्रखर बीम लाईट, प्लाझमा व लेझर बीम लाईट तसेच ‘डीजे’ साऊंड सिस्टिमवर बंदीचे लेखी आदेश काढण्यात आले होते. मात्र, मिरवणुकीत सहभागी बहुतेक मंडळांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत ‘डीजे’चा आवाज वाढविल्याचे चित्र होते. लोकांच्या कानात कापसाचे बोळे; मात्र पोलिसांच्या कानावर आवाज पोहोचत नसल्याचेच दिसून आले.

यंदा अण्णा भाऊ साठे जयंती उत्सवात ७३ मंडळे सहभागी झाली होती. त्यापैकी ४८ मंडळांनी सार्वजनिक मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी तीन पोलिस उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, २१ पोलिस निरीक्षक, ४५ सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षक, ७४० पोलिस अंमलदार, ४५० होमगार्ड आणि राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी तैनात होती. एवढा मोठा बंदोबस्त असतानाही पोलिस आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी मात्र मिरवणुकीच्या दणदणाटात हरवली. आदेश कागदावर; आवाज रस्त्यावर! अशी स्थिती होती.

गतवर्षीचा मृत्यू; तरीही बोध नाही...

गतवर्षी अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत सहभागी एका तरुणाचा छाती दुखू लागल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतरच दैनिक सकाळने डीजेमुक्त कृती समिती स्थापन करून लोकचळव उभी केली होती. त्यामुळे यंदा तरी ध्वनिप्रदूषणाची मर्यादा पाळली जाईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मिरवणुकीत सहभागी अनेकांच्या कानात कापसाचे बोळे घालण्याची वेळ आली. दरम्यान, पोलिसांनी मात्र आवाज मर्यादित असल्याचे सांगत सारवासारव केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणाले...

  • “मिरवणूक मार्गावर फोनवरून बोलताच येत नाही; मंडळांच्या साऊंड सिस्टिमचा आवाज खूप असल्याने गाडीत येऊन बोलतोय.”

  • “जयंती मिरवणुकीत आहे. साऊंड सिस्टिममुळे फोनवर ऐकू येत नाही; व्हॉट्सॲप मेसेज करा.”

  • “सकाळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वॉर्निंग दिली. काहींनी ज्यादा लावलेले टॉप काढूनही घेतले; तरी काहींनी आवाज जास्त सोडला.”

  • “वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर मंडळांनी साऊंडचा आवाज कमी केला; पण संधी मिळेल तेथे जास्त आवाज सोडला.”

  • “सर्व मंडळांच्या साऊंड सिस्टिमचा आवाज डेसिबल मीटरमध्ये घेतला आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई होईल.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT