saraf bagul.jpg 
महाराष्ट्र बातम्या

डोळ्यात मिरचीपुड फेकून लुटले... 

प्रमोद सावंत: सकाळ वृत्तसेवा

मालेगाव: शहरातील चंदनपूरी गेट भागातील सराफ व्यवसायीक झुंबरलाल बागुल हे दुकान बंद करून घरी परतत असतांना त्यांच्या डोळ्यात मिरची पुड फेकून लुटल्याचा प्रकार घडला. चोरट्यांनी त्यांच्याजवळील सुमारे नऊशे ग्रंम सोने चांदीचे दागिणे असा सुमारे पस्तीस लाखाचा ऐवज लुटला. शुक्रवारी (ता.१८) रात्री उशिरा हा प्रकार घडला.

प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ
संगमेश्वर भागातील नवनाथनगर येथे ही घटना घडली. या लुटीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. चोरटे बागुल यांच्या मागावर दुकानापासून असावे असा संशय आहे. छावणी पोलिस घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांचे एक पथक, चंदनपूरी गेट ते संगमेश्वर या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहे. बागुल दुकानातून आपल्या कलेक्टरपट्टा भागातील घरी जात असतांना, नवनाथ नगर येथील बोळीत चोरट्यांनी डाव साधला. दोन दुचाकीवर सहा लुटारू होते. त्यांनी श्री. बागुल यांची दुचाकी अँक्टीव्हा (एमएच -41 ए- 2680) देखील लुटून नेली. अँक्टीव्हाच्या डिक्कीत सोने होते. तर चांदीची पिशवी गाडीच्या हुकला होती. रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT