children-school-age sakal
महाराष्ट्र बातम्या

तुमचा मुलगा हुशार नाही, सारखा आजारी पडतो का? सुवर्णप्राशन संस्कार करा, वाढेल बुद्धी, स्मरण व रोगप्रतिकारक शक्ती

‘काश्यपसंहिते’त सांगितल्याप्रमाणे जन्मलेल्या नवजात शिशुपासून १० वर्षांपर्यंतच्या मुलांवर सुवर्णप्राशन संस्कार केले जातात. त्यातून हमखास मुलांची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा विश्वास आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : पौर्णिमेच्या दिवशी तयार केलेले गीर गायीचे तूप तयार करून त्यात वेगवेगळ्या आठ वनस्पती व मधाचा वापर करून सुवर्णभस्म तयार केले जाते. त्यात सोन्याचा धातू देखील असतो. ‘काश्यपसंहिते’त सांगितल्याप्रमाणे जन्मलेल्या नवजात शिशुपासून १० वर्षांपर्यंतच्या मुलांवर सुवर्णप्राशन संस्कार केले जातात. त्यातून हमखास मुलांची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती व रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा विश्वास आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

पौर्णिमेला तयार केलेले गीर गायीचे तूप इतर तुपापेक्षा शीतल व औषधी गुणधर्माचे मानले जाते. त्यात सूर्यकिरणे पडल्याने त्यातील गुणधर्म वाढतात. लेह स्वरूपात त्याचे शोषण शरीरात चांगल्या प्रकारे होते. सुवर्णप्राशन संस्कारात वापरला जाणारा मध हा मोनोफ्लोरल असतो. सुवर्णभस्म तयार करायला दहा ते १५ दिवसांचा अवधी लागतो.

तूप हे मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे काम करते. गुडूची (गुळवेल), वचा, शंकपुष्पी, आमलकी (आवळा), पिपली अशा आठ वनस्पतींचा वापर त्या तुपात केला जातो. त्यानंतर त्यात सुवर्णभस्म टाकतात आणि त्यातील कडवटपणा दूर करण्यासाठी व औषधी गुणधर्म टिकावेत, औषध खराब होऊ नये म्हणून मधाचा वापर त्यात केला जातो.

पुष्य नक्षत्राच्या दिवशी मुलांवर सुवर्णप्राशन संस्कार केले जातात. त्याचा अधिक लाभ होतो, असा अनुभव आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितला. पण, सुवर्णप्राशन संस्कार परस्पर न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, असेही सांगितले जाते.

सुवर्णप्राशन संस्काराचे असे सांगितले जातात फायदे...

  • - मुलांची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती वाढते

  • - एकाग्रता वाढून अभ्यासात मन राहते स्थिर

  • - मुलांची पचनशक्ती वाढून मुले होतात सुदृढ

  • - शारीरिक वाढ योग्य प्रमाणात होऊन मुले चपळ व हुशार होतात

  • - शारीरिक व मानसिक वाढीत न्यूनता असणाऱ्या बालकांसाठी फायदेशीर संस्कार

  • - त्वचेचे पोषण होते आणि ऐकणे व दृष्टी सुधारण्यास मदत होते

चिमुकल्यांच्या सुदृढ आयुष्याची काश्यपसंहिता

लहान मुलांसाठी ‘काश्यपसंहिता’ ग्रंथ असून त्यात लहान मुलांचे आजार व उपचारावर सांगितले आहे. त्यात सुवर्णप्राशन संस्काराचे वर्णन आहे. नियमित संस्कार केल्यास मेंदूच्या विकासाला मोठी मदत होते. त्यातून चिमुकला ‘श्रृतधर’ (एकदा ऐकले की कधीही न विसणारा) होतो. बल्य (शक्ती) वाढते व मुले मेधावी (हुशार) होतात. त्यांचे वर्ण (रंग) व कांती (चेहऱ्यावरील तेज वाढते) सुधारते. श्वसनासंदर्भातील विकारांवर प्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मोठी मदत होते. दीडशे वर्षांपूर्वी आचार्य काश्यप यांनी लिहिलेल्या काश्यपसंहितेत मुलांच्या सुदृढ भविष्याच्या अनुषंगाने वर्णन केलेले आढळते.

सुवर्णप्राशन संस्कारातून मुले होताहेत कुशाग्र

प्रत्येक महिन्यातील पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन संस्कार केला जातो. त्यातून मुलांची बुद्धि, शक्ती, वर्ण व चेहऱ्यावरील तेज वाढते. श्वसनासंबंधीच्या विकारांविरोधात या संस्कारामुळे प्रतिकारक शक्ती वाढते. मूल जन्मल्यापासून १० वर्षांपर्यंत हा संस्कार केला जातो. आयुर्वेदात या संस्काराला फार महत्त्व आहे.

- प्रा. प्रमोद इंगळे, बालरोग विभाग, शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT