DJ Noise pollution

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

मिरवणुकीत ‘डीजे’ऐवजी ४ कर्णे/स्पीकरसाठी परवानगी! परवाना देताना पोलिसांनी विचारली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नावे, वाद्य व मिरवणूक मार्गाची माहिती

सोलापूर शहरात दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोलापूर शहरात डीजेबंदी केल्याने पोलिसांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी करणाऱ्या मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त मंडळांच्या मिरवणुका दोन टप्प्यात निघणार आहेत. त्यामुळे पोलिसांना दोनदा बंदोबस्त नेमावा लागण्याची शक्यता आहे. सध्या जयंती साजरी करणाऱ्या मंडळांना पोलिसांकडून परवाने देण्याची कार्यवाही सुरु आहे. परवाना अर्जात मंडळांना पदाधिकाऱ्यांची नावे, देखावा, मिरवणुकीत मुर्ती कोणत्या वाहनावर असेल त्याची माहिती आणि मिरवणुकीतील वाद्य कोणते, मिरवणूक काढणार असाल तर मार्ग कोणता राहील, याची माहिती द्यावी लागणार आहे.

सोलापूर शहरात दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोलापूर शहरात डीजेबंदी केल्याने पोलिसांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी करणाऱ्या मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. आता शहरातील सात पोलिस ठाण्याअंतर्गत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी तेथील पोलिस प्रमुख संवाद साधत आहेत.

याशिवाय पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या नेतृत्वात वरिष्ठ अधिकारी, सर्व पोलिस निरीक्षकांचीही बैठक होणार आहे. तत्पूर्वी, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. त्यावेळी त्या सर्वांना आवाहन केले जाईल. दरम्यान, ‘रिपाइं’चे (आठवले गट) ज्येष्ठ नेते राजाभाऊ सरवदे यांनी एक ‘बेस एक टॉप’ स्वच्छ स्पीकर लावण्यास परवानगी द्यावी, आम्ही त्याप्रमाणेच मिरवणुका काढू, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे सोलापूर शहर पोलिस काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चार कर्णे लावण्यास परवानगी

गणेशोत्सवापासून पार पडलेल्या प्रत्येक सण-उत्सवात, जयंती मिरवणुकांमध्ये सोलापूर शहर पोलिसांनी चार कर्णे (स्पिकर) लावण्यास परवानगी दिली होती. काही मंडळांनी डीजे किंवा एक-दोन बेस, तेवढेच टॉप लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी ते काढायला भाग पाडले, काही ठिकाणी पोलिसांनी ते काढून घेतले. त्यामुळे हाच नियम सर्वांसाठी लागू असेल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT