Supreme Court Hearing 
महाराष्ट्र बातम्या

सर्वोच्च न्यायालयाकडून ठाकरे यांना दिलासा : १ ऑगस्टला सुनावणी

शिवसेनेचे म्हणणे ऐकले जाईल असे सरन्यायाधीशांनी सांगितले व तुमचे म्हणणे आम्ही १ ऑगस्टला एकू असेही स्पष्ट केले

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली - शिवसेनेत वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्दय़ांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा यांच्या पीठासमोर येत्या १ आॅगस्टला (सोमवारी) याबाबत सुनावणी होणार आहे. या मु्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले आहेत.

दोन्ही प्रकरणे परस्परांशी संबंधित असल्याने आयोगासमोरील सुनावणीला अर्थ रहात नाही असे शिवसेनेचे म्हणणे आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेनेने आज न्यायालयात दाखल केला तो न्यायालयाने मान्य केला असून सुनावणीची तयारी दर्शवली आहे. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.

१ ऑगस्टला याप्रकरणाबरोबरच शिवसेना आणि शिंदे गटाकडून दाखल इतर याचिकांसंबंधीही सुनावणी होणार आहे. शिवसेना या पक्षावर व त्याच्या निवडणूक चिन्हावर कोणाचा दावा खरा आहे, हे तपासण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला बजावलेल्या नोटिशीला स्थगिती देण्यात यावी अशी विनंती शिवसेनेने केली होती.

या याचिकेवरील सुनावणीला न्यायालयाने मान्यता दिली आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि शिवसेनेला पक्षावरील हक्क सांगण्याबाबत नोटीस बजावली आहे. दोन्ही बाजूंना ८ ऑगस्टपर्यंत बाजू मांडण्यास सांगितली आहे. मात्र न्यायालयातील याचिकांवर निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेऊ नये असे शिवसेनेने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्याचा भाव अचानक वाढला, चांदीतही मोठी उसळी; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना हमी, लेकरांना पैशांची कमी; ‘बालसंगोपन’च्या दीड लाख लाभार्थ्यांना मिळेना निधी

Beed Revenue Fraud: तहसीलदार आशा वाघ यांच्यावर गुन्हा; बनावट स्वाक्षऱ्यांनी आदेश, दिशाभूल केल्याचा ठापका

इंदिरानगरच्या नागरिकांना दिलासा! 'आमदार सत्यजित तांबेंनी अधिवेशनात उठवला आवाज'; उपनिबंधकावर कारवाईचे आदेश

Mega Police Recruitment : पुणे पोलिस दलात होणार मेगा भरती; दोन हजार पदांसाठी दोन लाख २० हजार अर्ज

SCROLL FOR NEXT