PFI Sakal
महाराष्ट्र बातम्या

PFI News: 'पीएफआय'ला अयोध्येत बाबरी मशीद.. न्यायालयात खळबळजनक खुलासा

सकाळ डिजिटल टीम

नाशिकः पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना देशविरोधी कारवाईच्या आरोपाखाली एटीएसने ताब्यात घेतले आहे. या संघटनेशी संबंधित धक्कादाक खुलासे सुनावणीदरम्यान पुढे येत आहेत.

२२ सप्टेंबर २०२२ रोजी एटीएसने राज्यभर छापे मारुन पीएफआयशी संबंधित पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यामध्ये मालेगाव येथून एक, कोल्हापूर येथून एक, पुण्यातून दोन आणि बीडमधून एकाला ताब्यात घेतले. या सर्वांना काल नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते.

एटीएसच्या तपासामध्ये 'पीएफआय'ला अयोध्येत उभारलं जात असलेलं राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मशीद उभारायची होती. २०४७पर्यंत पीएफआयला भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा प्लॅन होता, अशी माहिती समोर आलेली आहे. सरकारी पक्षाने नाशिक कोर्टामध्ये ही माहिती दिली.

दरम्यान, न्यायालयाने या संशयितांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एटीएसने मात्र अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी राखून ठेवली आहे.

व्हाट्सअपचा पाकिस्तानी ॲडमिन

एटीएसने तपासामध्ये संशयितांकडून हार्डडिस्क आणि महत्त्वाची कागदपत्रं हस्तगत केली आहेत. विशेष म्हणजे १७७ लोकांचा एक व्हाट्सअप ग्रुप होता. ज्याचा ॲडमिन पाकिस्तानात आहे. शिवाय विविध देशांतील लोक या ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपमधील चॅटिंग संशयास्पद आणि संवेदनशील असल्याचं पुढे येत आहेत. त्यामुळे न्यायालयाने योग्य तो निर्णय घेण्याचं आवाहन सरकारी पक्षानं केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची लाट ! गोंदियाने महाबळेश्वरलाही टाकले मागे ; राज्यातील इतर भागांत कसे आहे हवामान? जाणून घ्या

Yeola News : जीवघेणा नायलॉन मांजा! येवल्यात युवकाचा गळा चिरला, श्वासनलिकेला गंभीर दुखापत

Latest Marathi News Live Update : इंडिगो प्रकरणात कोणालाही सोडलं जाणार नाही- मुरलीधर मोहोळ

इंडिगोतील गोंधळाचा फटका आमदारांनाही, नागपूरला अधिवेशानासाठी जाणाऱ्यांचं तिकीट रद्द; विमानतळावरही मोठा गोंधळ...

Mango Alphonso : सगळ्या जगाला माहितीय हापूस कोकणाचा आहे, पण गुजरात म्हणतं हापूस आमचा..., आंबा बागायतदार लढा देणार

SCROLL FOR NEXT