Maharashtra budget railway
Maharashtra budget railway Esakal
महाराष्ट्र

Maharashtra Budget Railway: फलटण पंढरपूर रेल्वेला मान्यता, विदर्भातील शकुंतला पुन्हा सुरू होणार, अजित पवारांच्या मोठ्या घोषणा

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि विधान परिषदेत एकूण 8,609.17 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यानंतर आज अर्थमंत्री अजित पवार यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन करुन अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनाही अभिवादन केले. यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी रेल्वेसाठी मोठी घोषणा केली आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या आर्थिक सहभागातून सुरू असलेली अगमदनगर बीड परळी वैजीनाथ वर्धा यवतमाळ नांदेड गडचिरोली नागपूर बीड रेल्वे प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. कल्याण मुरबाड नाशिक-पुणे, सोलापूरतुळजापूर धारशिव या नवीन मार्गाची भूसंपादनाची कारवाई सुरू आहे. तर फलटण- पंढरपूर चिमुर वरोरा, जालना जळगाव, नांदेड बिदर या नवीन मार्गाकरिता प्रकल्प किंमतीच्या ५० टक्के आर्थिक सहभाग देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

जालना खामगाव आदिलाबाद माहूर वाशिम नांदेड हिंगोली मुर्तीजापूर यवतमाळ शंकुतला रेल्वे आणि पुणे लोणावळा रेल्वे मार्गिका ३ व ४ या प्रकल्पासांठी राज्य सरकार 50 टक्के आर्थिक सहकार्य देणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी आज केली आहे.

या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे

11 गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर जाण्यासाठी युनेस्कोला प्रस्ताव पाठवला आहे

जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार

नवीन सुक्ष्म व लघु उद्योग धोरण लागू केले जाणार आहे. राज्यात 18 लघु उद्योग स्थापन करणार, डाओसमधील करारानुसार 3 लाखाहून अधिक उद्योग राज्यात येणार आहेत.

सात हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सुरु करणार

नगरविकासासाठी 10हजार कोटी रुपयांची तरतुद. सार्वजनिक बांधकामास 19 हजार कोटी राखीव ठेवण्यात आले आहेत.

वीज उपलब्ध नसलेल्या 37 हजार अंगणवाड्यांना सौरऊर्जा संच देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषीपंप ही योजना सुरू करण्यात येणार आहे. यात 8 लाख 50 हजार नवे सौर कृषीपंप बसवण्यात येणार

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे मार्ग व प्रकल्पांसाठी 15,554 कोटींची तरतूद करण्यात आली आहे

महिलांसाठी 5,000 हजार पिंक रिक्षा उपलब्ध करून देणार

हर घर जल योजनेतून 1 कोटी नळ जोडण्यात येणार आहे

जालना यवतमाळ पुणे लोणावळा रेल्वे मार्गासाठी 50 टक्के रक्कम शासन देणार आहे.

रत्नागिरी भागवत बंदरासाठी 300 कोटी

मिरकरवाडा बंदराचे नूतनीकरण करण्यात येत आहे

संभाजीनगर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आर्थिक तरतूद करण्यात येत आहे

वर्सोवा वांद्रे ते पालघर हा सागरी सेतू बांधण्यात येणार आहे

मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

निर्यात वाढवण्यासाठी 5 इंडस्ट्रियल पार्कची निर्मिती करण्यात येत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Result 2024: बारावीच्या निकालात मुलींचा डंका, कोकणातील सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण, जाणून घ्या संपूर्ण निकाल

MS Dhoni Injury Update : MS धोनीला नक्की झाले तरी काय... उपचारासाठी जाणार लंडनला?

Latest Marathi News Live Update: राज्याचा बारावीचा निकाल जाहीर; ९३.३७ टक्के लागला निकाल

Pune Accident: पुणे अपघात प्रकरणी कारवाईला वेग! बार मालक, मॅनेजरसह पाच जणांना अटक

Gold Loan: आरबीआयच्या कडक नियमांमुळे गोल्ड लोन घेणाऱ्यांच्या अडचणी वाढणार; आता मिळणार कमी पैसे

SCROLL FOR NEXT