Eknath Khadase,Devendra Fadnavis Esakal
महाराष्ट्र बातम्या

'मी पुन्हा येईन' या नादात माझाच फोन टॅपिंग; एकनाथ खडसे

फोन टॅपिंग प्रकरणावरून एकनाथ खडसे आक्रमक

सकाळ डिजिटल टीम

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप (Phone Tapping) करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadase) चांगलेच आक्रमक झाले आहेत. "मी पुन्हा येईन" या नादात ६७ दिवस माझ्याच फोनच टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मी भाजपमध्ये असताना निवडणुकीच्या कालखंडात फोन टॅप केला होता.

राज्यात सध्या फोन टॅपिंगवरून जोरदार आरोप सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर आधीच गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही फोन टॅप करण्यात आला आहे. दरम्यान एकनाथ खडसे यांनीही त्यांचा फोन टॅप केल्याचा फडणवीसांवर आरोप केला आहे. मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, या नादात माझं फोन टॅपिंग करण्यात आलं असेही ते म्हणाले.

भाजपवर निशाणा साधताना खडसे म्हणाले, मी भाजपमध्ये असताना निवडणुकीच्या कालखंडात फोन टॅप केला होता. विरोधकांचा फोन टॅप करतात याची मला कल्पना होती, पण माझाच फोन टॅप केला याच मला दु:ख होतय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. पक्षामध्ये आपले प्रतिस्पर्धी आहेत, असं ज्यांना वाटलं त्यांनी माझा फोन टॅप केल्याचा माझा संशय आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याबाबत फोन टॅप झाल्याचे लेखी पत्र मुख्य सचिव, गृहसचिवांना दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते. यामध्ये पोलिसांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा फोन ६० दिवस टॅप केला होता. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन ६७ दिवस टॅपिंगवर ठेवण्यात आला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT