महाराष्ट्र बातम्या

पुरुषाच्या आधारकार्डवर महीलेचा फोटो

डिलेश्वर पंधराम

गोरेगाव : तालुक्यातील झांजिया येथील युवक निलेशकुमार अमूत बोपचे वय ३२ वर्ष यांच्या आधारकार्डवर महीलेचा फोटो व लिंग स्त्री लिहले असल्याने 7 वर्षापासुन  बँक खाते व शासकीय योजनापासुन वंचीत राहावे लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार निलेशकुमार बोपचे यांनी एम. ए. बिएड चे शिक्षण घेतले असून भारत सरकार यांच्या आधारकार्ड शक्तीनुसार सन 23 एप्रिल 2011 ला आधारकार्ड तयार केले या आधारकार्डवर नाव, जन्मतारीख, पत्ता, अंगठ्याचे ठस्से निलेशकुमार बोपचे यांचे असुन या आधारकार्डवर झांजिया येथील 60 वर्षीय महिला फुलनबाई गोवर्धन चौधरी यांचा फोटो आधारकार्ड सेतु केंद्र संचालक यांनी टाकल्याने बँक खाते व शासकीय योजनापासुन वंचीत राहावे लागत आहे.

निलेशकुमार अमूत बोपचे यांच्या आधारकार्डवरील महीलेचा फोटो हटविण्यासाठी 7 वर्षापासुन आधार केंद्र हेल्पलाईन क्रमांक 1947 वर संपर्क केला असता त्यांनी सांगीतल्याप्रमाणे निलेशकुमार बोपचे यांनी अनेकवेळा आधारकार्ड तयार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या आधारकार्डवरील महीलेचा फोटो हटविला नाही. त्यातच त्या महीलेचा 2 वर्षापुर्वी मूत्यु झाल्याची माहीती बोपचे यांनी दिली.

आधारकार्डवरील महीलेच्या फोटोची माहीती देण्यासाठी  हेल्पलाईन लँडलाईन क्रमांक 02222163492 मुंबई या क्रमांकावर अनेकदा संपर्क केला. मात्र या क्रमांकावर संपर्क होवु शकला नाही त्यामुळे आधारकार्ड तयार करणाऱ्या केंद्राला ई-मेल अाय डी वर माहीती देण्यात आली पण यात सुधारणा न करता प्रक्रियेत असल्याचे बोलले जात आहे.

आधारकार्डवरील महीलेचा फोटो काढुन नवीन आधारकार्ड तयार करण्याकरीता 4 ऑक्टोबरला नोंदणी केली आहे. आधारकार्ड नवीन तयार करा असी मागणी निलेशकुमार अमूत बोपचे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT