महाराष्ट्र

इंजिनातील बिघाडामुळे  रुईत कोसळले विमान

सकाळवृत्तसेवा

कळस -  तांत्रिक बिघाडामुळे बारामतीच्या कार्व्हर एव्हिएशन कंपनीचे विमान रुई (ता. इंदापूर) येथील दगडेवस्तीजवळ कोसळले. यात प्रशिक्षणार्थी वैमानिक सिद्धार्थ टायटस (वय ३२) हे जखमी झाले. त्यांच्या पायाला, हाताला व डोक्‍याला दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, टायटस हे पायलट सेन्सो १७२ मॉडेलचे विमान घेऊन बारामतीहून अक्कलकोटला गेले. सुमारे साडेतीन हजार फूट उंचीवरून ते विमान चालवीत होते. 

बारामतीकडे परतत असताना विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला. वैमानिकाने डांबरी रस्त्यावर विमान उतरविण्याचा  प्रयत्न केला असता, ते रस्त्यालगतच्या बाभळीच्या झाडाला धडकून शेतात पडले. विमान हेलकावे खात खाली येत असल्याचे पाहून ग्रामस्थांनी त्या दिशेने धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थांनी विमानाचा दरवाजा तोडून वैमानिकाला बाहेर काढले. त्याच्यावर येथील खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले. 

दरम्यान, घटनेनंतर सुमारे दीड तासाने अग्निशामक दलाची गाडी, पोलिस यंत्रणा हजर झाली. या वेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT