Modi in Maharashtra  sakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi In Maharashtra: जाणुन घ्या कसा असेल पंतप्रधान मोदींचा आजचा महाराष्ट्र दौरा

Chinmay Jagtap

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते मुंबईत अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा सेतूचे उद्घाटन करतील. तसेच नाशिक येथील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील.

सेतूच्या उद्घाटनानंतर दुपारी ते मुंबईत सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन विकासकामांचे उद्घाटन करतील. नवी मुंबईतील सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान साडेबारा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील.

ईस्टर्न फ्री वे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची ते पायाभरणी करतील. साडेआठ हजार कोटी रुपये खर्चाचा हा नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा आहे.

सूर्या प्रादेशिक पेयजल प्रकल्पाचा पहिला टप्पा ते राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील १४ लाख लोकांना पिण्याचे पाणी मिळेल. यावेळी दोन हजार कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले जातील

.यावेळी उरण खारकोपर रेल्वे मार्गाचा दुसरा टप्पा सुरू होईल. ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आणि खार रोड गोरेगाव दरम्यान च्या सहाव्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले जाईल.

तर नाशिक मधील २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. स्वामी विवेकानंद यांच्या १२ जानेवारी या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी १२ ते १६ जानेवारी दरम्यान हा महोत्सव केला जातो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT