महाराष्ट्र बातम्या

'चक्रीवादळामुळे फक्त गुजरातचं नुकसान झालं का?'

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तौक्ते वादळाने (Tauktae cyclone) फक्त गुजरातच नव्हे तर महाराष्‍ट्राचेही (Maharashtra) मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातप्रमाणे (Gujrat) महाराष्ट्रालाही मदत करावी, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (HM Dilip Walse Patil) यांनी केली. (PM Modi should help Maharashtra also said home minister Walse Patil)

गुरुवारी नागपूर विमानतळावर बोलताना पाटील म्हणाले, मोठे नुकसान झाल्याने केंद्राकडून राज्याला आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. गुजरातला हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली यावर कोणी आक्षेप घेण्याचे कारणच नाही. तिथे मोठे नुकसान झाले आहे. मात्र महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही.

पंतप्रधान कुठल्या एका राज्याचे प्रतिनिधी नसतात तर ते संपूर्ण देशाचे असतात. चक्रीवादळाचा इशारा आधीच देण्यात आला होता. त्याचे नियोजनसुद्धा केले होते. यानंतर ३०५ जणांचा मृत्यू झाला. याच्या चौकशीचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहे.

तत्पूर्वी नागपूर विमानतळावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी स्वागत केले. यावेळी प्रशांत पवार, शहर प्रवक्ता श्रीकांत शिवणकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

(PM Modi should help Maharashtra also said home minister Walse Patil)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Court Koyta Attack: पुणे पोलीस आयुक्तांना थेट कोर्टात बोलावलं; मुख्यमंत्र्यांचीही नाराजी, पोलीस दलात मोठ्या फेरबदलांची शक्यता

PM Kisan Yojana Installment Status : तुमच्या बँक खात्यात 'पीएम किसान'चे 2,000 रुपये अजून जमा झाले नाहीत? मग घाबरू नका; मोबाईलवर 'असे' तपासा तुमच्या हप्त्याचे स्टेटस

Mandar Kiwale Statement: ''शुभमदादा, तुझ्या खुनाचा बदला घेतला.. आम्हीच कात्रजचे राजे'' हल्ला केल्यानंतर आरोपींनी शुभमच्या नावाने फिरवला कोयता

Latest Marathi News Live Update : पवारांच्या राष्ट्रवादीच्या दिवसभरात ५ विभागांच्या बैठका होणार

आमदाराच्या लेकीच्या लग्नाला ४ लाख लोक, पत्रावळ्या हवेत फेकून वाटण्याची वेळ; जेवण हातानेच वाढून घेतलं, प्रचंड गर्दीमुळे गोंधळ

SCROLL FOR NEXT