Modi Uddhav Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

PM Modi on Thackeray: 'नकली संतान' उद्धव ठाकरेंवरून मोदींचा यूटर्न, नेमकं काय म्हणाले होते? जाणून घ्या

Modi on Uddhav Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना 'बाळासाहेबांचे नकली पुत्र' म्हणल्याचं प्रकरण चांगलंच गाजू लागलं आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना 'बाळासाहेबांचे नकली पुत्र' म्हणल्याचं प्रकरण चांगलंच गाजू लागलं आहे. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मला नकली म्हणणारे बेअकल' असं म्हणत ठाकरे यांनी बोचरी टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आठवड्यापूर्वी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीतील उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याची लोकांना आठवण होत आहे.

मोदी मुलाखतीमध्ये म्हणाले होते की, ''बायोलॉजिकली तर उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेतच. उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा मी दररोज त्यांची विचारपूस करायचो. बाळासाहेबांचे पुत्र असल्याने मी त्यांचा सन्मान करणारच. ते माझे शत्रू नाहीत. बाळासाहेबांचे माझ्यावर खूप प्रेम होते. त्यांचे कर्ज मी कधीही विसरणार नाही.''

मी बाळासाहेबांचा आदर करतो. उद्धव ठाकरे मला काहीही शिव्या देऊ द्या, पण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे मी त्यांच्याविरोधात काहीही बोलणार नाही. बाळासाहेबांचा आदर आहे म्हणूनच मी शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. आमच्याकडे सर्वाधिक आमदार होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री करणे हेच बाळासाहेब ठाकरे यांना माझी श्रद्धांजली होती, असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीचा दाखला देत त्यांनी आता यूटर्न घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे बायोलॉजिकली पुत्र म्हणणारे पंतप्रधान मोदी यांनी आता त्यांना नकली संतान का म्हटलं आणि त्यांच्यावर टीका का केली? असा प्रश्न पडत आहे.

उद्धव ठाकरे यांनी मोदींचा समाचार घेताना म्हटलंय की, 'माझ्यावर कितीही टीका करा पण माझ्या आई-वडिलांचा अपमान मी सहन करणार नाही. मला नकली संतान म्हणणारे ते स्वत:च नकली आणि बेअकल आहेत. महाराष्ट्राची जनता त्यांना धडा शिकवणार.' संजय राऊत यांनी देखील मोदींवर टीका केली. पंतप्रधान मोदी हे औरंगजेबाचे वंशज आहेत, असं ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT