Sushma Andhare Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : "मोदी, शाह यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच 2 BHKचा फ्लॅट घ्यावा"

PM मोदी आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतल्याची अंधारेंची टीका

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई आणि पुण्यातील दौऱ्यामध्ये वाढ झाली आहे. त्यावर विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.

मोदी आणि शाह यांनी सतत मुंबईत येण्यापेक्षा त्यांनी मुंबईतच एखादा 2 बीएचकेचा फ्लॅट घेऊन इथेच राहावं, असं सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची धास्ती घेतल्यामुळे मोदी आणि शाह यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. धास्तीमुळेच कंठघोष केला जात आहे. त्यांनी सतत दौरे करण्यापेक्षा मुंबईतच 2 BHKचा फ्लॅट घ्यावा, असंही सुषमा अंधारे यांनी म्हंटलं आहे.

तर गेल्या काही दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 वेळा दौरा केला. यावेळी त्यांनी अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं आहे. सत्ताधारी विरोधक यांच्या या दौऱ्यामुळे चांगलीच खडाजंगी दिसून आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात वाढ झाल्याचे विरोधकांनी म्हंटलं आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत येऊन अनेक विकास कामांचं उद्घाटन केलं आहे. त्यातही विरोधकांना राजनीति दिसून येते. विकासकामांकडे लक्ष्य द्या म्हणत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे. तर पुण्यातील कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra : नव्या वर्षात २४ सरकारी सुट्ट्या, भाऊबीजेची अतिरिक्त सुट्टी; अधिसूचना जारी

पुणे विमानतळ बनलंय तस्करीचा अड्डा! बँकॉकवरुन आलेल्या प्रवाशाकडून २.२९ कोटींचा गांजा जप्त

Kolhapur Accident : कोल्हापूर सायबर चौकात ब्रेकफेल ट्रकचा थरार; उसाच्या ट्रकने पाच वाहनांना उडवलं

Latest Marathi News Live Update : राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर

Nagpur Cold : नागपूर शहराची सकाळ गारेगार; तापमान ८.८ अंशावर

SCROLL FOR NEXT