PM Narendra Modi Esakal
महाराष्ट्र बातम्या

Old Pune-Mumbai highway Accident: बोरघाटातील आपघातग्रस्तांना PM मोदींकडून मोठी मदत जाहीर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या खासगी बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते. हे सगळे प्रवासी झांज वादक आणि कलाकर असल्याची माहिती आहे. या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. ट्विटमद्धे त्यांनी लिहले की, 'रायगडच्या बस अपघातात मृत्यू पावल्याची घटना दुर्दैवी आहे. ज्या लोकांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहे. जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे होतील अशी मला आशा आहे. रायगडमधील बस दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करत आहे', असं ट्वीट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघातात मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री घटनास्थळी पोहचले आहेत.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर शिंगरोबा मंदिराच्या मागे असलेल्या दरीमध्ये पहाटेच्या सुमारास खासगी बस कोसळली. या अपघातामध्ये आत्तापर्यंत 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज पहाटे 4 वाजता हा भीषण अपघात झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ही खासगी बस पुण्यावरून मुंबईला जात होती. पहाटे 4च्या सुमारास ही बस जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील शिंगरोबा मंदिराच्या पाठीमागे येताच चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे खासगी बस दरीत कोसळली. ही दरी 400 ते 500 फूट खोल आहे. या बसमधून 40 ते 45 प्रवाशी प्रवास करत होते. त्यापैकी 13 जणांचा जागीच मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT