Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसण्यापासून रोखलं; उद्धव ठाकरेंची नाराजी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहू येथील संत तुकाराम शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यासाठी आले होते. त्यानंतर ते मुंबईतील राज भवनात एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी हजर राहिले.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज देहू येथील संत तुकाराम शिळा मंदिराचं लोकार्पण करण्यासाठी आले होते. त्यानंतर ते मुंबईतील राज भवनात एका महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी हजर राहिले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हेसुद्ध हजर राहिले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीत बसण्यास मनाई केली होती.

दरम्यान आज देहू येथील लोकार्पण सोहळा संपन्न करून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई येथील कार्यक्रमाला येणार होते. मुंबईत त्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार आयएनएस शिखर बेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हीआयपी सूचीमध्ये आदित्य यांचं नाव नव्हतं. त्यानंतर आदित्य यांना मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून खाली उतरायला लावलं होतं. यावर मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर आदित्य यांना गाडीत बसण्याची परवानगी देण्यात आली होती.

या प्रकारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंत्रणावर राग व्यक्त केला आहे. ते म्हणाले की आदित्य ठाकरे हे फक्त आमचे पुत्र म्हणून नाही तर प्रोटोकॉलनुसार मंत्र्यांच्या रूपात पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी आले आहेत. त्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आज राजभवनातील पुनर्निर्मित रहिवाशी भवन 'जल भूषण'चे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये राज्यपालाचे कार्यालय आणि निवासस्थान सुद्धा असणार आहे. या उद्घाटनानंतर मोदी राजभवन परिसरातील ऐतिहासिक गुंडी मंदिरातही जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: PokerBaazi कंपनीचा शेअर कोसळला, 2 दिवसांत 20 टक्के घसरण; गुंतवणूकदारांचे 2,000 कोटी रुपये बुडाले

Viral Video: इंस्टा जाम, गुलाबी साडीत किन्नरचं सौंदर्य... सोशल मीडियावर धुमाकूळ, चक्क ६.२५ कोटी लोक झाले फिदा!

रोहितनंतर सूर्यकुमार यादवचीही विकेट पडणार? गौतम गंभीर 'लाडक्या'ला कर्णधार करणार

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

Video : तुम्हीपण असा डबा वापरता काय? बाबांनो, जेवणाचं होईल विष, धक्कादायक व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT