Sanjay Raut Sakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi in Mumbai : मोदींना इथं यावं लागतंय म्हणजे इथलं भाजपा नेतृत्व कमकुवत आहे - संजय राऊत

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक त्यांच्या पक्षाने फार गांभीर्याने घेतल्या आहेत, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आहेत. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोदींचा दौरा महत्त्वाचा मानला जातो. महिन्याभरातला हा दुसरा दौऱा आहे. त्यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर टीका केली आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक त्यांच्या पक्षाने फार गांभीर्याने घेतल्या आहेत. पण देशासमोर वेगळे प्रश्न आहेत. संसदेत विरोधकांनी अदानीच्या खिशात एवढा पैसे कुठून आला याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. याचे उत्तर मोदी द्यायला तयार नाहीत पण ते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत.

पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल बोलताना संजय राऊत पुढे म्हणाले, " पंतप्रधानांना मुंबईत यावं लागतंय म्हणजे भाजपचं इथलं राज्याचं नेतृत्व कमकुवत आहे असा याचा अर्थ होतो. यापूर्वी कधी नव्हे इतके पैसे केंद्राकडून राज्याला मिळाले असं म्हणणं म्हणजे यापूर्वी केंद्र महाराष्ट्राला सूडबुद्धीने वागवत होते हे स्पष्ट होतं. असं करून त्यांनी महाराष्ट्राशी वैर घेतलेला आहे. सरकार डबल इंजिनचा असो ट्रिपल किंवा चार इंजिनचा असो. अथवा हवेत उडणारा असो मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकणार."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL ची कॉपी करायला गेले अन् पाकडे तोंडावर आपटले; कवडी भावात विकली गेली PSL मधील हैदराबाद फ्रँचायझी, रिषभ-श्रेयस मिळून एवढे कमावतात...

BJP: भाजप नेत्याचा रहस्यमयी मृत्यू; रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, कुटुंबाने दिली धक्कादायक माहिती

Fact Check : एलिसे पेरीने लाईव्ह सामन्यात बाबर आझमला केलं प्रपोज? BBL सामन्यात नेमकं काय घडलं?

'चला काहीतरी चांगलं पहायला मिळणार...' समरचा भूतकाळ स्वानंदीला कळणार! आजीला विश्वासात घेऊन स्वानंदी घरातल्यांचं सत्य समोर आणणार

Bank Loan EMI: दिलासादायक बातमी! गृह आणि कार कर्जाच्या ईएमआयवर मोठी सवलत मिळणार; 'या' बँकेची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT