PM Modi Speech in Pune eSakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi Speech in Pune : गणेशोत्सवासोबत टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरु केला; पंतप्रधान मोदींकडून लोकमान्यांच्या कार्याला उजाळा

संतोष कानडे

PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बोलतांना नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याला उजाळा दिला. टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला तसा त्यांनी शिवजयंती उत्सवदेखील सुरु केल्याचं मोदींनी सांगितलं.

यावेळी बोलतांना नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकमान्य टिळक आपल्या माथ्याचे टिळक आहेत. पुण्याच्या धर्तीवर येण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य आहे. ही पुण्यभूमी छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधूंची पवित्र धरती आहे. तसेच ती ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची आदर्श भूमी आहे.

पुढे बोलतांना मोदी म्हणाले, दगडूशेठ पहिले व्यक्ती होते ज्यांनी टिळकांच्या आवाहनानंतर सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार मिळणं, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, मी हृदयातून आभार व्यक्त करतो.

''काशी आणि पुणे या शहरांची देशात विशेष ओळख आहे. विद्वत्ता इथं चिरंजीवि आणि अमरत्वाला प्राप्त झालेली आहे. या भूमीमध्ये माझा सन्मान होणं माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.''

मोदी पुढे म्हणाले की, जेव्हा कुठला पुरस्कार मिळतो, तेव्हा एक जबाबदारी येते. हा पुरस्कार मी १४० कोटी देशवासियांना समर्पित करतो. देशवासियांच्या सेवेत, अपेक्षांमध्ये कोणतीही कसर मी सोडणार नाही.

''लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची पूर्ण दिशाच बदलली होती. जेव्हा इंग्रजांनी भारत सोडून जाण्याची तयारी दर्शवली नव्हती तेव्हा टिळकांनी 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे' असं म्हटलं होतं. टिळकांचं स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान असल्यामुळे इंग्रजांना देश सोडून जावं लागलं. खुद्द महात्मा गांधी यांनी टिळकांना आधुनिक भारताचं महानायक म्हटलं होतं.''

पंतप्रधान बोलतांना पुढे म्हणाले, अनेक संस्था टिळकांनी सुरु केल्या आणि परंपरादेखील सुरु केल्या. सार्वजनिक गणपती महोत्सव सुरु केलाच तसेच त्यांनी गणेशोत्सवाबरोबच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरु केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला उजाळा देण्यासाठी त्यांनी शिवजयंती सुरु केल्याचं मोदींनी सांगितलं.

सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Pune Crime : पिंपरी चिंचवड हादरले ! निगडीतील मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; मेट्रो कामगाराला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT