Ajit Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar Latest News : '...तरच अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, भाजपने ठेवली मोठी अट',या बड्या नेत्याचा दावा

अजित पवार हे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी वारंवार त्यांना भेटत असल्याचाही या नेत्याने केला दावा

अंकिता खाणे (Ankita Khane)

Sharad Pawar : 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल ही अट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार समोर ठेवली आहे. त्यामुळेच अजित पवार हे शरद पवारांचे समर्थन मिळवण्यासाठी वारंवार त्यांची भेट घेत असल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.'

त्याचबरोबर पुढे वड्डेटीवार म्हणाले की, 'अजित पवार हे शरद पवारांना भेटण्यासोबतच त्यांच्या सोबत येण्यासाठी दया, याचना करत असावेत, असंही ते पुढे म्हणालेत. तर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरून थोडा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र आज शरद पवार यांच्या बीडमधील भाषणाने तो संभ्रम दूर होईल असेही वडेट्टीवार पुढे म्हणाले आहेत.

आणखी काय म्हणाले विजय वड्डेटीवार?

सत्तेसाठी चाललेला हा खटाटोप आहे. येथे विचारांना तिलांजली दिली आहे. विकासाला तिलांजली दिली आहे. येथे महत्त्व केवळ खुर्चीला दिसत आहे असं दिसुन येत आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

तर शरद पवारांची भुमिका बदलेल असं वाटतं नाही, त्यांनी आधी त्यांची भुमिका मांडली आहे. आताही इंडियाच्या बैठकीत ते आपली भुमिका स्पष्ट करतील, आम्हाला विश्वास आहे शरद पवार आपली भुमिका बदलणार नाहीत असा विश्वासही विजय वड्डेटीवार यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT