PM SHRI Yojana will be implemented in Maharashtra decision state cabinet meeting shinde govt  google
महाराष्ट्र बातम्या

PM SHRI Yojana : राज्यात लागू होणार 'पीएमश्री योजना'; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!

PM SHRI Yojana in Maharashtra : केंद्र सरकारची पीएमश्री योजना ही आता महाराष्ट्रात देखील लागू होणार आहे.

रोहित कणसे

PM SHRI Yojana in Maharashtra : केंद्र सरकारची पीएमश्री योजना ही आता महाराष्ट्रात देखील लागू होणार आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळांच्या अद्यवतीकरणासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.

या येजनेअंतर्गत शाळेतील नवीन तंत्रज्ञान, स्मार्ट क्लास, खेळ, ग्रंथालय अशा आधिनिक सोयी सुविधा अद्यावत करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि साक्षरता वाढवणं, विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना या योजनेअंतर्गत सुचवल्या जातील. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या शाळांच्या माध्यमातून अंमलात आणले जाईल.

सप्टेंबर २०२२ मध्ये केंद्राने पंतप्रधान स्कूल फॉर रायजींग इंडीया ही योजना सुरू केली आहे. देशभरातील १४,५९७ शाळा या अंतर्गत सुरू करण्यात येणार आहेत.

राज्यात याची अंमलबजावणी हवी यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीय निर्णय घेण्यात आला. टप्प्याटप्प्याने या शाळा सुरू करण्यात येतील.

PM SHRI योजना काय आहे?

प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया (PM-SHRI) ही केंद्र सरकारची एक योजना आहे ज्यामध्ये देशातील सध्याच्या शाळांना मॉडेल स्कूल म्हणून विकसित केले जाईल . देशातील १४,५९७ शाळा या योजनेशी जोडल्या जातील .

पहिल्या टप्प्यात ही योजना ५ वर्षांसाठी (२०२२-२०२७) लागू केली जाईल. योजनेचे एकूण अंदाजे अंदाजपत्रक 27 हजार ३६० कोटी रुपये आहे .

या अर्थसंकल्पात केंद्र सरकारचा हिस्सा १८ हजार १२८ कोटी असेल . त्याचबरोबर १८ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे . या योजनेत सरकारी शाळांचा समावेश करण्यात येणार आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court : नागरिकांना वगळले जात असेल तर SIR चा उपयोग काय? उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला कडक प्रश्न

Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं! म्हणाली, संघासाठी रक्ताचे पाणी केले, पण...; आता नवी कॅप्टन कोण?

माधुरी दीक्षितच्या सासूसासऱ्यांना पाहिलंत का? कुठे राहतात, काय करतात श्रीराम नेने यांचे आई- वडील?

Maharashtra Drought : दुष्काळाचे विदारक चित्र ! पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या सर्जा-राजाला बाजारात विकताना शेतकरी हमसून रडला, VIDEO VIRAL

'मी अनेक वर्षांपासून गहू खाल्लाचं नाही' ऐश्वर्या नारकर इतकं वय होऊनही फिट कशा? म्हणाल्या...'घरगुती डबा अन् साधा आहार'

SCROLL FOR NEXT