gulATI 
महाराष्ट्र बातम्या

पीएमसीने घेतला खातेदाराचा बळी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी बँकेत पैसे अडकल्याचा धसका घेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटी यांना बँकेत पैसे अडकल्याच्या चिंतेने हृदयविकाराचा धक्का आला.

संजय गुलाटी मुंबई येथे पीएमसी बँकेविरोधात प्रदर्शन केल्यानंतर घरी परतले. घरी आल्यानंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. संजय गुलाटी हे 51 वर्षांचे होते.

दरम्यान, पीएमसी बँकेत त्यांचे 90 लाख रुपये जमा होते. वृत्तानुसार, गुलाटी यांनी जेट एअरवेजमधील नोकरी गमावली होती. त्यानंतर आता पीएमसी बँक घोटळ्यामुळे त्यांनी आयुष्यभर कमावलेली सर्व संपत्ती फसली होती. गुलाटी यांना हा धक्का सहन झाला नाही आणि त्यांचा मृत्यू झाला.

मृत्यूसाठी पीएमसी जबाबदार- 
संजय गुलाटी यांना व्यवसायासाठी पैशांची गरज होती, त्यामुळे ते गेल्या अनेक दिवसांपासून चिंतीत होते. अनेक दिवसांपासून त्यांना तोटा सहन करावा लागत होता. ते नैराश्यात होते. त्यांच्या मृत्यूसाठी पीएमसी बँक जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. भारतीय रिजर्व्ह बँकेने पीएमसी बँकेच्या बचत खातेदारांसाठी सहा महिन्यांमध्ये पैसे काढण्याची मर्यादा 25,000 रुपयांनी वाढवून 40,000 रुपये केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत गुढीपाडव्याचा उत्साह ; महिलांची भव्य बाईक रॅली

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT