Court Judgement on Anil Deshmukh Bail e sakal
महाराष्ट्र बातम्या

अनिल देशमुखांना जामीन की तुरुंगातील मुक्काम वाढणार? आज निकाल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शंभर कोटी वसुलीप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज (Anil Deshmukh Bail) दाखल केला होता. आज न्यायालय त्यावर निर्णय देणार आहे. आता अनिल देशमुखांना जवळपास १३५ दिवसांच्या कोठडीनंतर जामीन मिळतो, की न्यायालय पुन्हा त्यांची कोठडीत रवानगी करतेय? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी केल्यानंतर त्यांनी अनिल देशमुखांवर लेटरबॉम्ब टाकला होता. देशमुखांनी पोलिस बदल्यांमध्ये घोटाळा केला असून बार मालकाकडून शंभर कोटी वसुली करण्याचे टार्गेट पोलिसांना दिले होते, असे गंभीर आरोप परमबीरसिंह यांनी केले होते. त्यानंतर अनिल देशमुख हे तपास यंत्रणांच्या रडारवर आले. त्यांच्या नागपूर, काटोल आणि मुंबईतील घरा, कार्यालयावर ईडी, सीबीआय, आयकर विभागाची छापेमारी झाली. यामध्ये काही संशयास्पद कागदपत्रं तपास यंत्रणांच्या हाती लागल्याची माहिती होती. देशमुखांना वारंवार जबाब नोंदवण्यासाठी ईडीने नोटीस बजावली. मात्र, देशमुखांनी हजेरी लावली नाही. शेवटी त्यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस काढण्यात आली. त्यानंतर अनिल देशमुख १ नोव्हेंबरला स्वतः ईडी कार्यालयात हजर झाले. त्यांची दिवसभर चौकशी झाल्यानंतर त्यांना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. देशमुखांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने काही ईडी कोठडी दिली. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली.

अनिल देशमुख हे जवळपास १३५ दिवसांपासून तुरुंगात आहेत. त्यांनी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर सुनावणी घेण्यात आली. पण, ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला आहे. देशमुखांना जामीन देऊ नये, असा युक्तीवाद ईडीने केला आहे. आज न्यायालय यावर निकाल देणार असून सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT