police combing.jpg 
महाराष्ट्र बातम्या

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 'इतक्या' गुंडांची धरपकड! वाचा..

नरेश हारनोळ : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये शनिवारी (ता.१९) मध्यरात्री पुन्हा कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील ५८ गुन्हेगारांची धरपकड केली. दरम्यान, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गस्ती पथकाकडून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. 

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता.२१) मतदान होते आहे. त्यामुळे, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून सतर्कता बाळगली जाते आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता.१९) रात्री दहा वाजेपासून रविवारी (ता.२०) पहाटे २ वाजेपर्यंत शहर-परिसरात ऑलआऊट व कोम्बिंग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली. यादरम्यान, आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन पोलिसांनी ९७ पैकी ५८ सराईत गुन्हेगारांची धरपकड केली.

या ठिकाणी रात्रभर पोलिसांची गुन्हेगारांची शोध मोहिमेची कारवाई

शहरातील नांदुरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळगाव, राऊ हॉटेल, अंबड टी पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायणबापू नगर, पाथर्डी फाटा, संसरी नाका, फुलेनगर, पंचवटी, वाघाडी, मल्हारखाण झोपडपट्टी, सातपूर गाव या ठिकाणी रात्रभर पोलिसांनी गुन्हेगारांची शोध मोहिमेची कारवाई केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह, तडीपार तपासणी, हॉटेल, लॉजेस तपासण्यात आले. यावेळी शहराच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली.

७३ जणांविरुद्ध मुंबई पोलिस ऍक्‍टनुसार कारवाई

रेकॉर्डवरील ९७सराईत गुन्हेगारांचा शोध घेत ५८ गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. हॉटेल्स-लॉजेस्‌ व ढाब्याची तपासणी करीत ७३ जणांविरुद्ध मुंबई पोलिस ऍक्‍टनुसार कारवाई करण्यात आली. नाकाबंदीमध्ये ५४६ वाहनांची तपासणी करण्यात येऊन ५० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत, ११ हजार ८०० रुपयांचा दंड वसुल केला. त्याचप्रमाणे, शहरात ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत ८४ टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. तर नाकाबंदीदरम्यान, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ४ वाहनचालकांविरोधात ड्रंक ऍण्ड ड्राईव्हनुसार कारवाई करण्यात आली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

SCROLL FOR NEXT