solapur city cp m raj kumar

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

पोलिस आयुक्तांना २ वर्षे पूर्ण! सोलापुरात गुन्हे घटले; तपासाचा टक्का वाढला, ‘डीजेमुक्त सोलापूर’ व भोंगेमुक्त सोलापूर मोहिमेला ठोस कृतीची जोड, वाचा...

सण-उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर शहरात जबरदस्तीने वर्गणी वसुली, मोठ्या आवाजातील डीजे, चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग असे गुन्हे सर्रास घडत होते. मात्र गेल्या दोन वर्षांत ही चित्र बदलण्यात पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांना यश आले आहे. ‘सकाळ’च्या पुढाकारातून स्थापन झालेल्या डीजेमुक्त सोलापूर कृती समितीला पोलिस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहरातून डीजे व लेझर लाइट हद्दपार करण्याचे लिखित आदेश काढले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सण-उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर शहरात जबरदस्तीने वर्गणी वसुली, मोठ्या आवाजातील डीजे, चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग असे गुन्हे सर्रास घडत होते. मात्र गेल्या दोन वर्षांत ही चित्र बदलण्यात पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांना यश आले आहे. ‘सकाळ’च्या पुढाकारातून स्थापन झालेल्या डीजेमुक्त सोलापूर कृती समितीला पोलिस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत शहरातून डीजे व लेझर लाइट हद्दपार करण्याचे लिखित आदेश काढले. धार्मिक स्थळांवरील भोंगेही शांततेत उतरविण्यात आले. त्याचबरोबर चोरी, घरफोडी, मोटार वाहन चोरी यांसारख्या मालमत्ताविषयक गुन्ह्यांमध्ये ७ ते १३ टक्क्यांची घट झाली असून गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण १२ ते २९ टक्क्यांनी वाढले आहे.

पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दरमहा आढावा बैठका घेत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या कामकाजावर लक्ष ठेवले. गुन्हे उघडकीस येण्यास विलंब होत असल्यास गुन्हे शाखेची मदत दिली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचे वेळोवेळी कौतुक करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात आला. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सोलापूर शहराचा पदभार स्वीकारून त्यांना दोन वर्षे पूर्ण होत असून, पुढील सर्व जयंती व सण-उत्सव डीजेमुक्त करण्यासाठी ठोस नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

स्थानबद्धतेची रेकॉर्डब्रेक कारवाई

२०२२ मध्ये २,७०९ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली होती. २०२३ मध्ये हा आकडा ३,०४२ वर पोहोचला. पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या कार्यकाळात ही कारवाई अधिक तीव्र झाली. २०२४ मध्ये ३,७९१ तर २०२५ मध्ये ४,७६६ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. याशिवाय ५० जणांवर एमपीडीएअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली. परिणामी शहरातील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाली.

पोलिसांकडे दोन मोठी आयुधे

रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या वर्तनात सुधारणा व्हावी यासाठी तडीपार व एमपीडीए ही महत्त्वाची आयुधे आहेत. पोलिस सामान्यांसाठी नेहमी उपलब्ध असले पाहिजेत. टीमसोबत सुसंवाद ठेवला, आत्मविश्वास वाढविला की कामगिरी प्रभावी होते. दोन वर्षांत केलेल्या कारवायांचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. यामध्ये सोलापूरकरांचेही मोठे योगदान आहे.

- एम. राज कुमार, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

चेन स्नॅचिंग

  • सन दाखल उघड टक्केवारी

  • २०२२ ३१ २२ ७०.९६

  • २०२३ ३३ २५ ७५.७५

  • २०२४ ३६ ३२ ८८.८८

  • २०२५ ४२ ३८ ९०.४७

  • --------------------------------------------------------------

घरफोडी

  • सन दाखल उघड टक्केवारी

  • २०२२ १२७ ७२ ५६.७

  • २०२३ १३३ ८६ ६४.७

  • २०२४ १३१ ८९ ६७.९

  • २०२५ ७७ ५८ ७५.३

  • --------------------------------------------------------------------------

  • सर्व प्रकारची चोरी

  • सन दाखल उघड टक्केवारी

  • २०२२ ५९८ २३९ ४०

  • २०२३ ५८६ ३२५ ५५.५

  • २०२४ ५७८ ३३८ ५८.५

  • २०२५ ५०१ ३५० ६९.९

  • --------------------------------------------------------------------------

मोटार वाहन चोरी

  • सन दाखल उघड टक्केवारी

  • २०२२ ३७७ १४५ ३८.५

  • २०२३ ३६७ १८९ ५१.५

  • २०२४ ३५१ २०० ५७

  • २०२५ ३०३ १९९ ६५.७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT