Krishna Prakash Meets Sharad Pawar Sakal
महाराष्ट्र बातम्या

बदल्यांचे आदेश निघताच कृष्ण प्रकाश शरद पवारांच्या भेटीला

अंकुश शिंदे यांनी पदभारही स्विकारल्याने आता या भेटीचे नेमके काय कारण असू शकेल याचीही चर्चा आहे.

सकाळ डिजिटल टीम

नुकत्याच झालेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे मावळते पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज सकाळीच कृष्णप्रकाश अचानकच गोविंदबाग येथे आले.

त्यांनी पवार यांच्याशी दहा ते बारा मिनिटे संवाद साधला आणि तेथून ते निघून गेले. नेमकी काय चर्चा झाली याची माहिती त्यांनी देण्यास नकार दिला. ही खाजगी भेट होती इतकेच त्यांनी या भेटीबाबत सांगितले. राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्या झाल्यानंतर त्यात कृष्णप्रकाश यांचाही नंबर लागल्यानंतरच या बाबत चर्चा सुरु झाली होती.

पवार यांनाही कोल्हापूरला जाण्याची घाई होती, त्या मुळे त्यांनीही माध्यमांशी संवाद साधला नाही. दरम्यान अंकुश शिंदे यांनी पदभारही स्विकारल्याने आता या भेटीचे नेमके काय कारण असू शकेल याचीही चर्चा होती. दुसरीकडे कृष्णप्रकाश यांना थांगपत्ता न लागू देता बदली केली गेल्याचीही जोरदार चर्चा आहे, कारण बदली झाली तेव्हा ते परदेशात होते, असेही बोलले जात आहे. दरम्यान बदलीनंतर त्यांनी पवार यांच्याशी संवाद साधत आज चर्चा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT