solapur city police comissioner m raj kumar

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

पोलिस आयुक्तांचे आदेश! सोलापूर शहरातील ‘या’ १७ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या, ५ पोलिस ठाण्यांना मिळाले नवे प्रभारी; कोणाची बदली कोठे? वाचा...

सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांपैकी पाच पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलले आहेत. शहर पोलिस दलातील एकूण १७ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरूवारी (ता. २) पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. त्यानुसार पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांपैकी पाच पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलले आहेत. शहर पोलिस दलातील एकूण १७ पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरूवारी (ता. २) पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. त्यानुसार पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले.

सोलापूर शहरातील विजापूर नाका, सलगर वस्ती पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा कार्यकाळ संपला होता. तर सदर बझार, एमआयडीसी, जेलरोड पोलिस निरीक्षकांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या होत्या. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची खांदेपालट केली. दक्षिण वाहतूक शाखा, महिला सुरक्षा कक्ष, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, सायबर पोलिस ठाणे, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, वेल्फेअर येथील प्रभारी अधिकारी बदलले आहेत. यात दुय्यम पोलिस निरीक्षकांच्या देखील बदल्या करण्यात आल्या आहेत.

शहर पोलिस आयुक्तालयातील अन्य शाखा तथा विभागांमध्ये प्रभारी म्हणून काम करणाऱ्या पोलिस निरीक्षकांना व पोलिस ठाण्यात दुय्यम निरीक्षक म्हणून काम करणाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण व विकास देशमुख यांची विनंतीनुसार बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

शहरातील ७ पोलिस ठाण्यांचे प्रभारी असे...

  • १) सदर बझार : अजित लकडे

  • २) विजापूर नाका : सुहास चव्हाण

  • ३) एमआयडीसी : भाऊसाहेब बिराजदार

  • ४) जेलरोड : उदयसिंह पाटील

  • ५) सलगर वस्ती : श्रीशैल गजा

  • ६) फौजदार चावडी : महादेव राऊत

  • ७) जोडभावी पेठ : सुरज मुलाणी

‘या’ अधिकाऱ्यांच्याही बदल्या

दादा गायकवाड (आर्थिक गुन्हे शाखा), विजय खोमणे (दक्षिण वाहतूक शाखा), भालचंद्र ढवळे (सायबर सेल), उमाकांत शिंदे (विशेष शाखा), जयदीप कळेकर (जेलरोड, दुय्यम पोलिस निरीक्षक), आसिफ राजा शेख (महिला सुरक्षा कक्ष), संगीता पाटील (एमआयडीसी, दुय्यम निरीक्षक), स्नेहा म्हेतर (अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष), वैष्णवी पाटील (वेल्फेअर), रविंद्रनाथ भंडारे (सदर बझार, दुय्यम पोलिस निरीक्षक), विकास देशमुख (फौजदार चावडी, दुय्यम पोलिस निरीक्षक) अशा अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Dham Temple Tragedy : बिहारच्या अशोकधाम मंदिरात चेंगराचेंगरी, ७ भाविकांचा मृत्यू; गर्दीत विजेची तार पडली अ्न...

Jaggery Industry Law: गूळ उद्योगासाठी आता स्वतंत्र कायदा; साखर आयुक्तालय सुधारित मसुदा शासनाकडे पाठविणार

Nashik Sisters Drown : आई लगेच येईल, सांगून डॉक्टर बाबा दवाखान्यात गेले; 2 चिमुकल्या मुलींचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू

Marathi News Live Updates : जोतिबा डोंगरावर आज श्रावणषष्ठी यात्रा; महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात राज्यांतून तीन ते चार लाख भाविक येणार

Maharashtra Contractors Dues: कंत्राटदारांचे ८६, ६६२ कोटी थकीत; आझाद मैदानावर उद्यापासून आंदोलन; राज्य कंत्राटदार फेडरेशनचा निर्णय

SCROLL FOR NEXT