mpsc students Sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC Syllabus : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

सकाळ डिजिटल टीम

पुणेः एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उद्या पुण्यामध्ये आंदोलनाची हाक दिली होती. परंतु हे आंदोलन आचारसंहितेच्या कारणामुळे होणार नसल्याची शक्यता आहे. कारण पोलिसांनी आंदोलनासाठी परवानगी नाकारलेली आहे.

उद्या सकाळी ८ वाजता अलका चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन होणार होते. परंतु कसबा पेठ निवडणुकीमुळे मतदार संघात आचारसंहिता लागू आहे. यामुळे कोणतेही आंदोलन करण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करावा यासाठी विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबरला आंदोलन केले होते. यानंतर सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्यांना तत्वतः मंजुरी दिली. तरीही आयोगाने अद्याप घोषणा केली नाही.

यासाठी विद्यार्थी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. मात्र आता पोलिसांनीच आंदोलनाला परवानगी नाकारल्यामुळे विद्यार्थी काय भूमिका घेणार, महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पॅटर्न 2025 पासून लागू करावा ही विद्यार्थ्यांची मुख्य मागणी आहे. या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी वारंवार आंदोलन केलेलं आहे. सरकारने या मागणीला मंजुरी दिलेली असली तरी आयोगाने मात्र याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच विद्यार्थी संतप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कर्नाटक-तामिळनाडूमधील कावेरी वादावर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

Alien Star Reels Viral: इंस्टावर व्हायरल झालेला ‘एलियन स्टार’ कोण? आधी लोकांनी उडवली थट्टा, आता प्रत्येक व्हिडिओला मिलियन व्ह्यूज

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

मुलांनो! राजकारणात पडू नका; भ्रष्टाचाराच्या आरोपांनी व्यथित माजी मंत्र्याची 'शेवटची चिट्ठी', कार्यालयात आढळला मृतदेह

Congress Leader Murder : काँग्रेस नेत्याची मुलासह निर्घृणपणे हत्या ! कारला घेरलं, गोळ्या झाडल्या अन् धारदार शस्त्रांनी बाप-लेकाला संपवलं

SCROLL FOR NEXT