party
party esakal
महाराष्ट्र

निवडणूक काळात पार्ट्यांवर ‘एक्साईज’चे लक्ष! ढाबे, हॉटेलवर मद्यपान नकोच, अन्यथा 5000 तर ढाबा चालकाला 25000 दंड; 2 लाख मद्यपींनी घेतले परवाने

तात्या लांडगे

सोलापूर : लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायला १२ एप्रिलपासून सुरवात होणार आहे. त्यानंतर ढाब्यांवरील पार्ट्या रंगतील. अशा पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके नेमली आहेत. त्यांच्याकडून विनापरवाना मद्यपान करणाऱ्यांसह ढाब्यांवरील मद्यपी व ढाबा मालक-चालकांवर कारवाई होईल. कारवाईनंतर ढाबा चालकाला २५ हजार तर मद्यपींना पाच हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो, असा इशारा अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला आहे.

निवडणूक म्हटले की दारू अन्‌ पैसा या दोन गोष्टींची नेहमीच चर्चा असते. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून विशेष पथके नेमली आहेत. वास्तविक पाहता कोणालाही कोणत्याही ठिकाणी मद्यपान करता येत नाही. दुसरीकडे परमीट रूम, बिअरबारशिवाय कोठेही दारू, वाइन, बिअरची विक्रीही करता येत नाही. मद्यपींकडे आजीवन किंवा एक वर्षाचा परवाना बंधनकारक असून परवानाधारक मद्यपींनी परमीट रूममध्येच मद्यपान करणे आवश्यक आहे.

नियम मोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करून न्यायालयात नेले जाते. न्यायालयाच्या माध्यमातून संबंधितांवर दंडात्मक कारवाई होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता निवडणूक काळात अशाप्रकारच्या कारवाई केल्या जाणार आहेत. परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या विदेशी-देशी व गावठी दारू वाहतूक व विक्रीवर देखील लक्ष राहील, असेही श्री. धार्मिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

तुम्हालाही करता येईल ‘या’ क्रमाकांवर तक्रार

जिल्ह्यात कोणत्याही गावात अवैध दारू विक्री, मद्यपान, हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री, वाहतूक होत असल्यास कोणत्याही नागरिकास १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर तर ८४२२००११३३ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर तक्रार करता येईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली जाईल, असे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

विनापरवाना मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होणार

ढाब्यांवर मद्यपान किंवा मद्यविक्री करता येणार नाही. मद्यपान करणाऱ्या प्रत्येकाकडे त्यासंबंधीचा परवाना बंधनकारक आहे. विनापरवाना मद्य खरेदी करणारे, परमीट रुमशिवाय कोणत्याही ठिकाणी मद्यपान करणारे, विनापरवाना मद्य घेऊन जाणारे कारवाईसाठी पात्र राहतील. निवडणूक काळात ढाबे, हॉटेलवरील पार्ट्यांवर आमच्या पथकांचे लक्ष राहणार असून त्याठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर

वर्षभरातील ‘एक्साईज’ची कारवाई

  • ढाबे चालकांवर कारवाई

  • ५०

  • न्यायालयातून दंड

  • १२.५० लाख

  • मद्यपींवर कारवाई

  • १४८

  • मद्यपींनी भरलेला दंड

  • १,३०,५००

--------------------------------------------------

दोन लाख जणांकडे मद्यपानाचा परवाना

मद्यपान करताना किंवा पिण्यासाठी खरेदी केलेली दारू नेणाऱ्याकडे परवाना जरुरी आहे. परवाना नसल्यास दोनशे-तीनशे रुपयांच्या दारूसाठी पाच हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास ८५ हजार व्यक्तींनी मद्यपानाचा आजीवन परवाना काढून ठेवला आहे. तर एक वर्षासाठी परवाना घेतलेल्या मद्यपींची संख्या जिल्ह्यात सव्वालाखांपर्यंत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

Nashik Lok Sabha Election 2024: ना पाण्याची सोय, ना उन्हापासून संरक्षण! मतदारांमध्ये तीव्र नाराजी; व्हिलचेअरमुळे दिलासा

SCROLL FOR NEXT