Fraud Crime esakal
महाराष्ट्र बातम्या

Online Fraud:ऑनलाईन फ्रॉडमध्ये गेलेले पैसे मिळाले परत, सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, मिळाले ७ लाख ७५ हजार परत

टास्कमधून गेलेले पैसे आणले परत,सायबर पोलिसांची कामगिरी: ७ लाख ७५ हजार ४६ रुपयांचा समावेश

सकाळ डिजिटल टीम

Online Fraud: टास्कच्या नावावर खासगी कंपनीत काम करणाऱ्या युवकाची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्याच्या खात्यातून पोलिसांनी ७ लाख ७५ हजार ४६ रुपये परत केले. तीन महिन्यांपूर्वी त्याची सायबर चोरट्याने ८ लाख ७७ हजार रुपयाने फसवणूक केली होती. याबाबत त्याने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

तपासादरम्यान पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमित डोळस आणि त्यांच्या पथकाने सायबर चोरट्याने केलेल्या मनी ट्रेलचे विश्‍लेषण केले. ज्या बॅंकेच्या खात्यातून दुसऱ्या बॅंक खात्यात वळती झाली त्या बॅक खात्यांचा शोध घेतला. (Latest Marathi News)

याशिवाय बॅंक खात्याची माहिती मिळविण्यासाठी तांत्रिक कौशल्याचा वापर करुन आरोपीचे डेबिट तात्काळ गोठविले. यावेळी त्याच्या बॅंक खात्यात २४ लाख ७९ हजार ९६ रुपये शिल्लक होते. त्यातून न्यायालयात फसवणूक झालेली रक्कम परत मिळविण्यासाठी अर्ज करीत, ७ लाख ७५ हजार ४६ रुपये परत केले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT