Deekshabhoomi  sakal
महाराष्ट्र बातम्या

Deekshabhoomi : पोलिसांनी घातला दीक्षाभूमीला वेढा

दीक्षाभूमी परिसरात विकासकामाअंतर्गत भूमिगत वाहनतळ करताना करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला धोका होण्याच्या चिंतेने सोमवारी (ता.१) सरकार-प्रशासनासह स्मारक समितीच्या विरोधात आगडोंब उसळला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दीक्षाभूमी परिसरात विकासकामाअंतर्गत भूमिगत वाहनतळ करताना करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला धोका होण्याच्या चिंतेने सोमवारी (ता.१) सरकार-प्रशासनासह स्मारक समितीच्या विरोधात आगडोंब उसळला. वाहनतळ परिसरात जाळपोळ केली. यामुळे आज पोलिसांनी दीक्षाभूमीच्या दिशेने येणारे सर्व मार्ग बंद केले. जणू दीक्षाभूमीला वेढा घातल्याचे चित्र होते.

दीक्षाभूमीचे प्रवेशद्वार कुलूपबंद केल्याने एकही अनुयायी दीक्षाभूमीपर्यंत पोहचू शकला नाही. जिल्हाधिकारी इटनकर यांनी मंगळवारी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाला एक दिवसाची सुटी जाहीर केली होती. यामुळे आंबेडकरी समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. दीक्षाभूमीला सरकारने ‘अ’ दर्जाचे पयर्टन स्थळ घोषित केले. यानंतर २०० कोटी ३० लाख रुपयांच्या विकासाचा आराखडा तयार केला.

विकासाच्या पहिल्या टप्प्यात भूमिगत वाहनतळाच्या कामाला सुरुवात झाली. या वाहनतळामुळे स्मारकाला धोका निर्माण झाल्याचे संदेश सोशल मीडियावर फिरू लागले आणि आंबेडकरी अनुयायांनी क्रांतिभूमीला वाचवण्यासाठी आंदोलनाला सुरुवात केली. सुरुवातीला सामंजस्याने समितीबरोबर बैठका घेण्यात आल्या. ‘एनएमआरडी’च्या अधिकाऱ्यांनी अनुयायांशी चर्चा केली, परंतु सर्व चर्चा निष्फळ ठरल्यामुळे अनुयायांनी थेट दीक्षाभूमीवर तयार होणाऱ्या वाहनतळाची तोडफोड केली, जाळपोळ केली.

खड्डा बुजविण्याचा संकल्प

अनेक आंदोलनकर्त्यांनी काल पैसे गोळा केले. या पैशातून ‘जेसीबी’ आणून हा खड्डा बुजविण्यात येईल, असा संकल्प कार्यकर्त्यांनी केला होता. आज सकाळपासूनच अनेक अनुयायी दीक्षाभूमीच्या दिशेने निघाली होती. परंतु दीक्षाभूमीच्या सभोवतालच्या रस्त्यांवर कठडे लावल्‍याने एकाही अनुयायाला प्रवेश दिला गेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

SCROLL FOR NEXT