traffic police sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर शहरातील १२००० बेशिस्त वाहनचालकांना पोलिसांच्या नोटिसा! ७००० बेशिस्तांना समन्स, ३०० चालकांना वॉरंट; ‘या’ तारखेपूर्वी दंड भरा, अन्यथा कारवाई

वाहतूक नियम मोडल्याने दरवर्षी सोलापूर शहर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. १२ हजार बेशिस्त वाहनधारकांना पोलिसांनी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना १४ डिसेंबरला होणाऱ्या लोकअदालतीत उपस्थित राहून दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : रस्त्यावरून ये-जा करताना वाहतूक नियम मोडल्याने दरवर्षी सोलापूर शहर वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. शहरातील १२ हजार बेशिस्त वाहनधारकांना वाहतूक पोलिसांनी नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना आता १४ डिसेंबरला होणाऱ्या लोकअदालतीत उपस्थित राहून दंडाची रक्कम भरावी लागणार आहे.

शहरातून वाहन चालविताना मर्यादित वेग, दुचाकीवर ट्रिपलसीट नको, विरुद्ध दिशेने वाहन चालवू नये, मद्यपान, ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह, कार चालविताना सीटबेल्टचा वापर, लेन कटिंग नको, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा मालाची वाहतूक नको, वाहन चालविण्याचा परवाना असावा, असे वाहतूक नियम आहेत. याशिवाय शहरातील सिग्नलवर थांबावे, सिग्नल तोडू नये, फॅन्सी नंबरप्लेट, सायलेन्सरमध्ये बदल, असेही नियम आहेत. तरीसुद्धा, अनेकजण वाहतूक नियम मोडून वाहन चालवितात. त्या बेशिस्त वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जाते.

सोलापूर शहरातील अशा बेशिस्त १२ हजार वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी लोकअदालतीच्या अनुषंगाने नोटिसा पाठविल्या आहेत. त्यांना दंड भरावाच लागेल, अन्यथा नोटीस, समन्स बजावून देखील दंड न भरणाऱ्यांना वॉरंट काढले जाते. त्यामुळे प्रत्येक बेशिस्त वाहनचालकांना दंड भरावाच लागतो. त्या वाहनचालकाने कोणता नियम मोडला, त्याचा फोटो देखील त्यास येतो. त्यामुळे शक्यतो कोणालाच चुकीचा दंड पडत नाही, तसे झाल्यास तो दंड रद्द देखील करता येतो.

लोकअदालतीपूर्वी दंड भरण्याची सुविधा

येत्या १४ डिसेंबर रोजी जिल्ह्यात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या वाहनधारकांवर वाहतूक नियम मोडल्याने दंडात्मक कारवाई झाली, त्यांनी लोकअदालतीत येऊन दंड भरावा. त्यापूर्वी त्या वाहनधारकांना शहर वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात किंवा वाहतूक पोलिसांच्या माध्यमातूनही दंडाची रक्कम भरता येईल.

- सुधीर खिराडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

बेशिस्त वाहनधारकांवरील कारवाई

  • वाहनधारकांना नोटीस

  • १२,०००

  • समन्स किती बजावले

  • ७,०००

  • वॉरंटची बजावणी

  • ३००

  • लोकअदालत कधी

  • १४ डिसेंबर

‘या’ ठिकाणी भरता येईल दंड

ज्या बेशिस्त वाहनधारकास वाहतूक पोलिसांचा दंड आला आहे, त्यांना शहरातील वाहतूक पोलिसांच्या कार्यालयात जाऊन दंड भरता येतो. याशिवाय वाहतूक पोलिसांकडील ई-चालानच्या मशिनद्वारे देखील दंड भरण्याची सुविधा आहे. दंड भरून त्या बेशिस्त वाहनचालकांना पुढील कारवाई टाळता येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT