महाराष्ट्र बातम्या

अवघ्या तीन दिवसात पोलिस भरतीचा जीआर गृहविभागाकडून रद्द

पूजा विचारे

मुंबईः एसईबीसी आरक्षणाशिवाय पोलिस भरतीचा जीआर अवघ्या तीन दिवसांत गृहविभागानं मागे घेतला आहे. एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना ईडब्लूयएसचा लाभ मिळावा म्हणून गृहविभाग नवीन जीआर शुद्धीपत्रक काढणार आहे. ४ जानेवारीच्या जीआरमध्ये एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना भरतीत खुल्या प्रवर्गातून भरती व्हावं असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे ४ जानेवारीचा जीआर रद्दा केल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. 

राज्यात पोलिस भरती 2019 करीता एसईबीसी (SEBC) च्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे, त्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. गृह विभागाने  4 जानेवारी 2021 ला निर्गमित केलेला सरकारनं निर्णय रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

पोलिस शिपाई भरती 2019 करीता ज्या एसईबीसी (SEBC) उमेदवारांनी अर्ज केले होते, त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील कडील 23 डिसेंबर 2020 च्या सरकार निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टीकोनातून सुधारित सरकार निर्णय गृह विभागाकडून लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले.

बुधवारीच राज्यातील पोलिस भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी SEBC आरक्षण न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाकडून घेण्यात आला होता. पोलिस भरतीदरम्यान जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी आणि शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा. SEBC तून अर्ज केलेल्या पोलिस भरतीतील उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू केली जाणार, असा निर्णय घेऊन त्याबाबतचा GR देखील जारी करण्यात आला होता.

Police recruitment 2019 GR canceled Anil deshmukh SEBC reservation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वतः लाटते पोळ्या, मोदकही बनवते, 'या' ठिकाणी आहे मराठी अभिनेत्रीचं हॉटेल; मेन्यू सांगत म्हणाली- गणपतीत...

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT