police bharati sakal news
महाराष्ट्र बातम्या

पोलिस भरतीच्या उमेदवारांची पहिल्यांदाच बायोमेट्रिकवर नोंद! स्पोर्ट्‌सचे शूज वापरण्याचे बंधन; परगावच्या उमेदवारांची सोलापूर शहर पोलिसांनी केली राहण्याची सोय

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचे चेहरे व त्यांच्या दोन्ही हातांची बोटांचे ठसे (फिंगर) बायोमेट्रिकवर नोंदविले जातील. मैदानी चाचणी यशस्वी केलेल्या ज्या उमेदवारांची लेखी परीक्षेला निवड होईल, त्यांचे चेहरे, बोटांचे ठसे यात साम्यता आहे का, याची पडताळणी होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीला बुधवारपासून (ता. ११) सुरवात होणार आहे. सोलापूर शहर पोलिस दलातील ७३ पोलिस शिपाई आणि सहा बॅण्ड्‌समनची पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी चार हजार १५१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मैदानी चाचणीसाठी परगावाहून येणाऱ्या गरजू, गरीब विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी केली आहे.

सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने घेतली जाणारी मैदानी चाचणी ११ ते १४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. १४ तारखेला फक्त महिला उमेदवार आणि माजी सैनिक संवर्गातील उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. दरम्यान, मागील भरतीवेळी धावण्यासाठी उमेदवारांना बाहेर नेले होते. पण, यंदा धावणे, गोळाफेक हे सगळे शहर पोलिसांच्या मुख्यालयातच होईल, अशी माहिती पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिली. भरतीसाठी उमेदवार आल्यानंतर सुरवातीला त्यांची कागदपत्रे, हॉल तिकीट तपासले जातील. त्यानंतर त्यांची उंची मोजून पुढील प्रकारासाठी त्यांची निवड होईल. मानवी हस्तक्षेपाशिवाय मैदानी चाचणी पार पडणार असून धावणे या प्रकाराचा वेळ मशिनद्वारे आपोआप नोंदविली जाणार आहे.

मैदानी चाचणीसाठी उमेदवारांना कोणतेही शूज वापरता येणार नाहीत, त्यांना फक्त स्पोर्ट्‌सचे शूज वापरता येणार आहेत. दरम्यान, उमेदवारांना काही हरकत किंवा आक्षेप असल्यास ते सुरवातीला सहायक पोलिस आयुक्त (ॲडमिन) यांच्याकडे दाद मागू शकतात. त्याठिकाणी समाधान न झाल्यास ते उमेदवार पुढे पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्याकडे दाद मागू शकतात. मैदानी चाचणीवेळी प्रत्येक उमेदवारांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे, असेही पोलिस आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

लेखी परीक्षेपूर्वी ‘बायोमेट्रीक’द्वारे खबरदारी

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांचे चेहरे व त्यांच्या दोन्ही हातांची बोटांचे ठसे (फिंगर) बायोमेट्रिकवर नोंदविले जातील. मैदानी चाचणी यशस्वी केलेल्या ज्या उमेदवारांची लेखी परीक्षेला निवड होईल, त्यांचे चेहरे, बोटांचे ठसे यात साम्यता आहे का, याची पडताळणी होणार आहे. जेणेकरून लेखी परीक्षेतील गैरप्रकार होणार नाहीत, असा त्यामागील हेतू असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT