

Maharashtra Weather Update
ESakal
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला असल्याचे दिसून येत होत. चीनच्या किनारपट्टीवर धडकलेल्या डॉल्फिन चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या ढगांचे प्रमाण घटले होते. परिणामी भारतीय मान्सूनवर त्याचा प्रभाव पडल्यामुळे पावसाने ब्रेक घेतल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे. मात्र आता पुन्हा भारतात मान्सूनचा जोर वाढणार असून महाराष्ट्रात जोरदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.