पोलिस भरती Sakal
महाराष्ट्र बातम्या

पोलिस भरतीसाठी बुधवारपासून ‘मैदानी’! सोलापूर जिल्ह्यातील १७४ जागांसाठी ८३३४ जणांनी केले अर्ज; मैदानावर सीसीटीव्ही अन्‌ व्हिडिओ रेकॉर्डिंगही, वाचा...

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील ९५ पदांसाठी एकूण चार हजार १८३ तर शहर पोलिसांकडील ६९ पदांसाठी चार हजार १५१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या उमेदवारांची बुधवारपासून (ता. ११) मैदानी चाचणी होणार आहे. त्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील एका पदासाठी ४४ तर शहर पोलिसांकडील एका पदासाठी ५२ उमेदवार भरतीत उतरले आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील ९५ पदांसाठी एकूण चार हजार १८३ तर शहर पोलिसांकडील ६९ पदांसाठी चार हजार १५१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. या उमेदवारांची बुधवारपासून (ता. ११) मैदानी चाचणी होणार आहे. त्यात सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील एका पदासाठी ४४ तर शहर पोलिसांकडील एका पदासाठी ५२ उमेदवार भरतीत उतरले आहेत.

सोलापुरातील पोटफाडी चौकाजवळील शहर पोलिस व ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयातील मैदानावर उमेदवारांची शारीरिक तथा मैदानी चाचणी पार पडणार आहे. ज्या उमेदवारांनी एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज केले, त्यांना एकाच ठिकाणी ‘मैदानी’ देता येणार आहे. दरम्यान, मैदानी चाचणीसाठी पहिल्या दिवशी ५०० आणि त्यानंतर १२, १३ फेब्रुवारीला एक-एक हजार उमेदवारांना ‘मैदानी’साठी बोलावले आहे.

१४ फेब्रुवारीला ग्रामीण पोलिसांनी सुटी दिली असून १५ फेब्रुवारीला एक हजार आणि १६ फेब्रुवारीला ६८३ उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले आहे. दुसरीकडे शहर पोलिसांनी सलग पाच दिवस ‘मैदानी’साठी उमेदवारांना बोलावले आहे. १६ फेब्रुवारीपूर्वी शहर व ग्रामीण पोलिस दलातील पदभरतीची मैदानी चाचणी संपणार आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये देखील याचवेळी मैदानी चाचणी होणार आहे.

मैदानी चाचणीचे नियोजन असे...

  • ११ ते १६ फेब्रुवारी या काळात पोलिस भरतीतील मैदानी चाचणीचा पहिला टप्पा पार पडणार आहे

  • सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील ९५ जागांसाठी ४१८३ जणांचे अर्ज; एका पदासाठी ४४ उमेदवार

  • सोलापूर शहर पोलिस दलात ६९ पदांसाठी भरती; एकूण ४१५१ उमेदवारांनी केले अर्ज

  • ११ फेब्रुवारीला प्रत्येकी ५०० जणांची मैदानी, १४ फेब्रुवारीला सुट्टी, चार दिवस प्रत्येकी ८०० ते १००० उमेदवारांची मैदानी

मैदानावर सीसीटीव्ही अन्‌ व्हिडिओ रेकॉर्डिंगही

पोलिस भरतीची मैदानी चाचणी ज्या मैदानावर होणार आहे, त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. याशिवाय उंची, छातीचे मोजमाप, धावणे, लांबउडी, गोळाफेक या प्रत्येक प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय होणार असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिस प्रमुखांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT