पोलिस sakal
महाराष्ट्र बातम्या

32 वर्षांनंतर जिल्ह्यात वाढणार पोलिस ठाणी! ड्रग प्रकरणानंतर आता चिंचोली एमआयडीसीवर पोलिसांचा 24 तास वॉच; ‘या’ 16 ठिकाणी नवीन ठाण्यांचे प्रस्ताव

चिंचोली एमआयडीसीतील एका बंद फॅक्टरीत एमडी ड्रग तयार केले असल्याची बाब मुंबई व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी शोधून काढली. २०१८ मध्ये देखील याच एमआयडीसीत एफेड्रीनचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता चिंचोली एमआयडीसीत स्वतंत्र पोलिस ठाणे होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर १० ठिकाणी देखील नवीन ठाण्यांचा प्रस्ताव आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील एका बंद फॅक्टरीत एमडी ड्रग तयार केले असल्याची बाब मुंबई व सोलापूर ग्रामीण पोलिसांनी शोधून काढली. २०१८ मध्ये देखील याच एमआयडीसीत एफेड्रीनचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता चिंचोली एमआयडीसीत स्वतंत्र पोलिस ठाणे होणार आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर १० ठिकाणी देखील नवीन ठाण्यांचा प्रस्ताव आहे. तसेच वाहतूक शाखेच्या पाच पोलिस ठाण्यांचाही प्रस्ताव आहे.

सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांची हद्द १९९२ रोजी स्वतंत्र झाली. ३२ वर्षांत सोलापूर शहर- जिल्ह्याचा विस्तार झाला, लोकसंख्याही वाढली, मात्र पोलिस ठाण्यांची संख्या व पोलिस मनुष्यबळ त्या प्रमाणात वाढले नाही. गुन्हेगारी वाढली, अशावेळी नागरिकांना तक्रार देण्यासाठी काही किलोमीटर ये-जा करावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन आकृतिबंध मंजूर केल्यानंतर त्यानुसार आता नवीन पोलिस ठाण्यांचे प्रस्ताव मागविले जात आहेत. सोलापूर ग्रामीणमध्ये सध्या २५ पोलिस ठाणी असून त्यात आणखी ११ पोलिस ठाण्यांची भविष्यात भर पडणार आहे. तब्बल ३२ वर्षांनंतर ग्रामीण पोलिसांना वाढीव पोलिस ठाणी व त्या प्रमाणात वाढीव मनुष्यबळ मिळेल आणि त्यामुळे गुन्हेगारीवरील नियंत्रणास मोठा लाभ होईल, असा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.

‘या’ ११ नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव

मोहोळ पोलिस ठाण्याअंतर्गत शेटफळ, करमाळ्याअंतर्गत जेऊर व जिंती, सांगोला पोलिस ठाण्याअंतर्गत हतीद व महूद, मंगळवेढ्याअंतर्गत नंदेश्वर, अक्कलकोट दक्षिणअंतर्गत करजगी, अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याअंतर्गत शिरवळ, वळसंग पोलिस ठाण्याअंतर्गत रे नगर, अकलूजअंतर्गत श्रीपूर व सोलापूर तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत चिंचोली एमआयडीसी अशा ११ ठिकाणी नवीन पोलिस ठाणी अपेक्षित आहेत. त्यानुसार ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून नवीन पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे.

अपघात रोखण्यासाठी ‘वाहतूक’ची ५ नवीन ठाणी

रस्ते अपघातात सोलापूर शहर- जिल्हा पहिल्या टॉपटेन जिल्ह्यात नेहमीच आहे. अपघात कमी करणे, बेशिस्त वाहनचालकांना कारवाईच्या माध्यमातून स्वयंशिस्त लावण्यासाठी ग्रामीणमध्ये वाहतूक शाखेची पाच पोलिस ठाणी वाढणार आहेत. त्यात मोहोळ शहर, बार्शी शहर, अक्कलकोट उत्तर, पंढरपूर शहर, अकलूज शहर या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नवीन ठाणी व्हावीत, असा प्रस्ताव ग्रामीण पोलिसांनी गृह विभागाला पाठविला आहे.

गुन्हेगारी व अपघात नियंत्रणास होईल मोठी मदत

सोलापूर ग्रामीणमध्ये काही वाढीव पोलिस ठाण्यांची गरज असून त्यानुसार शासनाला प्रस्ताव पाठविला जाणार आहे. अपघातांची संख्या वाढल्याने वाहतूक शाखेचीही पोलिस ठाणी वाढविण्याचा प्रस्ताव आहे. पोलिस ठाण्यांची संख्या वाढल्यानंतर निश्चितपणे गुन्हेगारीवर नियंत्रण शक्य होईल आणि अपघात देखील कमी होण्यास मदत होईल.

- प्रितम यावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan News: आर्थिक संकटात पाकिस्तानचा मोठा यू-टर्न! इस्लामच्या नावाखाली 50 वर्षांपूर्वी बंद केलेली ‘ही’ गोष्ट पुन्हा सुरू

Loni Kalbhor Crime: लोणी काळभोरमध्ये गावठी दारू अड्ड्यावर छापा; ३५० लिटर रसायनमिश्रित दारू नष्ट, तिघांवर गुन्हा..

Pune Nasrapur crime: आरोपीला मध्यरात्री घटनास्थळी नेले अन्... ; नसरापूर अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा

Angarki Sankashti 2026 : गणपतीपुळेत लोटला भाविकांचा महासागर! अंगारकीला 70 हजार भक्तांनी घेतले दर्शन; 80 लाखांची उलाढाल

Jalna Crime: पारधमध्ये ‘लव्ह जिहाद’! दहा वर्षांपासून पीडितेवर अत्याचार, जालन्यातून दोन संशयित अटकेत!

SCROLL FOR NEXT