Darshana Pawar Murder Case Esakal
महाराष्ट्र बातम्या

Darshana Pawar Murder Case: राहुल हंडोरेला पकडण्यासाठी पोलिसांनी लढवली शक्कल, असा आला जाळ्यात

दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली

अंकिता खाणे (Ankita Khane)

दर्शना पवार हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी राहुल हंडोरेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मुंबई येथून हंडोरेला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

राहुल हंडोरेला अटक केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासाबाबत काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी राहुल हंडोरे याचे लोकेशन शोधण्यासाठी महत्त्वाची एका कल्पनेचा वापर केला. त्या युक्तीचा फायदा राहुल हंडोरेला शोधताना झाला आहे.(Latest Marathi News)

राजगडाच्या पायथ्याशी चार दिवसांपूर्वी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर पोलिसांनी दर्शना पवारची ओळख पटवून तपासाला सुरुवात केली. तेव्हा दर्शनासोबत राजगडावर गेलेला तिचा मित्र राहुल हंडोरे गायब झाल्याचे लक्षात येताच पोलीसांनी राहुल हंडोरेचा शोध सुरू केल्या.(Latest Marathi News)

पुणे पोलिसांची पाच पथकं राहुल हंडोरेचा शोध घेत होती. राहुल हंडोरे हा अनेक राज्यांमध्ये फिरत होता. मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा असा त्याचा प्रवास सुरु होता. मात्र, पुणे पोलिसांची पथकं त्याचा पाठलाग करत होती अशी माहीती पोलीसांनी दिली आहे.(Latest Marathi News)

पुणे ग्रामीण पोलिसांनी आपल्या तपासाची फारशी माहिती बाहेर जाऊ दिली नाही. पोलीस तपास मोहीमेबद्दल गुप्तता बाळगून होते. राहुल हंडोरे याला शोधण्यासाठी त्याच्या नातेवाईकांचीही मदत घेतली जात होती. पोलिसांनी राहुल हंडोर याचे लोकेशन शोधून काढण्यासाठी एक युक्ती वापरली होती.(Latest Marathi News)

पोलीस राहुल हंडोरेला त्याच्या नातेवाईकांच्या मोबाईल फोनवरुन पैसे पाठवत होते. यामुळे राहुल हंडोरे याचे लोकेशन ट्रेस होऊ शकेल. त्यावरुन पोलिसांना समजले कि, राहुल हंडोरे हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरत आहे आणि ते राहुलचा पाठलाग करत राहिले. अखेर राहुल हंडोरे याला मुंबईवरुन पुण्याकडे जात असताना पोलिसांनी अटक केली.(Latest Marathi News)

अटक केल्यानंतर राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यासंदर्भात पोलीसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. राहुल हंडोरे आणि दर्शन पवार हे दोघेही पुण्यात एमपीएससीचे शिक्षण घेत असताना भेटले होते. हे दोघे एकमेकांचे नातेवाईकही होते.(Latest Marathi News)

राहुलची दर्शनाशी विवाह करण्याची इच्छा होती. एमपीसी उत्तीर्ण झाल्यानंतर घरच्यांनी दर्शनाचा दुसऱ्या एका मुलासोबत विवाह ठरवला होता. त्यानंतर 'मला वेळ द्या 'अशी विनंती राहुलने तिच्या घरच्यांना केली होती. पण घरच्यांनी नकार दिला होता.(Latest Marathi News)

दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरे याच्यासह १२ जून रोजी राजगड किल्ल्याच्या परिसरात फिरण्यासाठी गेली होती. दोघेही दुचाकीवरुन तिथं दाखल झाले होते. सकाळीच्या १० च्या सुमारास राहुल हांडोरे किल्ल्यावरुन एकटाच खाली येत असल्याचं एका हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आलं. तेव्हापासून राहुल हांडोरे गायब होता.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT