महाराष्ट्र

अजितदादांच्या दारात पोलिस उभे, कधीही अटक करतील : रावसाहेब दानवे

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी : "काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा झाला. ज्या अजितदादांनी हा केला, त्यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकतील. अजितदादांच्या दारात पोलिस उभे आहेत,'' असा जोरदार हल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर जाहीर सभेत केला. 

मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांच्या अटल संकल्प महासंमेलनात दानवे बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह या भागातील आमदार, पदाधिकारी निगडीत झालेल्या या सभेला उपस्थित होते. 

दानवे म्हणाले, "भाजपच्या सरकारवर भ्रष्टाचाराला एकही आरोप नाही. पण काँग्रेस सरकारच्या काळात टूजी घोटाळ्यापासून सिंचन घोटाळ्यापर्यंत अनेक घोटाळे झाले. आमच्या सरकारच्या विरोधात काँग्रेसने वेगवेगळ्या यात्रा काढल्या, पण काहीही परीणाम झाला नाही. त्यांची यात्रा गेली, त्या भागात भाजप जिंकले. विरोधकांनी जातीय मतभेद निर्माण करण्याचे प्रयत्न केले.''

फडणवीस सिंचन घोटाळ्याविषयी म्हणाले, "राज्यात 40 लाख हेक्‍टर क्षेत्रांवर आम्ही सिंचन क्षमता नेली. आधीच्या सरकारने सिंचन घोटाळा केला. त्यांच्या काळात निविदांपेक्षा 40 ते 50 टक्के जादा दरांनी कामे दिली. त्यांनी केलेल्या नऊ हजार कोटी रुपयांच्या निविदा रद्द केल्या. आम्ही त्याच निविदा काढल्या, त्यापैकी 62 टक्के कमी दराने, 27 टक्के त्याच निविदा दराने, तर एक टक्का निविदा पाच टक्के जादा दराने आली. 30 ते 40 टक्के जादा दराने निविदा देऊन तुम्ही तुमच्या तिजोऱ्या भरायच्या.''

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुपारी पत्रकार परीषद झाली. त्यावेळी सिंचन घोटाळ्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी पवार म्हणाले, "सिंचन घोटाळा प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. त्याबद्दल आमची चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी आवश्‍यक सहकार्य आम्ही देत आहोत.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT