Sharad Pawar Ramraje Naik Nimbalkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra politics : शरद पवारांचा आदेश आल्यास 'या' मतदारसंघातून लोकसभा लढवणार; रामराजेंची मोठी घोषणा

राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी रामराजेंचे नाव निश्चित असल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ डिजिटल टीम

माढ्याचा खासदार यावेळेस फलटणच्या वाड्यातीलच होईल. वाड्याबाहेरचा खासदार होणार नाही, असे खोचक उत्तर देत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना अप्रत्यक्ष आव्हानच दिले.

सातारा : पक्षाने आदेश दिला तर मी माढा मतदारसंघातून (Madha Constituency) लोकसभा लढण्यास तयार आहे. त्याबाबत खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांचा निर्णय अंतिम असेल; पण माढ्याचा खासदार फलटणच्या वाड्यातील होईल. वाड्याबाहेरचा होणार नाही, असे स्पष्ट मत विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्हा बॅंकेच्या नफ्यातून शेतकऱ्यांसाठी विविध तरतुदी करण्यासाठी आज बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीनंतर माजी सभापती, आमदार रामराजे (Ramraje Naik-Nimbalkar) यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त फलटण येथे नुकत्याच झालेल्या अभीष्टचिंतन सोहळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रामराजेंना दिल्लीत पाठवण्याची गरज आहे, त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढे हा विषय मांडून मान्य करून घेतला जाईल, असे जाहीर केले होते.

त्यामुळे राष्ट्रवादीकडून माढा लोकसभेसाठी रामराजेंचे नाव निश्चित असल्याचे स्पष्ट झाले; पण रामराजेंची भूमिका महत्त्वाची होती. ते या निर्णयाला मान्यता देणार का?, तसेच शरद पवारांचा दुजोरा मिळणार का?, हा प्रश्‍न राजकीय वर्तुळातून उपस्थित होऊ लागला होता.

यासंदर्भात रामराजेंना विचारले असता ते म्हणाले, पक्षाने आदेश दिला तर मी माढा लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवारांचा निर्णय अंतिम असेल; पण माढ्याचा खासदार यावेळेस फलटणच्या वाड्यातीलच होईल. वाड्याबाहेरचा खासदार होणार नाही, असे खोचक उत्तर देत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना अप्रत्यक्ष आव्हानच दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT